1 min read

सावित्रीबाई फुले विद्यापीठाने २०२३ ची दिनदर्शिका ताबडतोब मागे घ्यावी- महाराष्ट्र भूषन सचिन भाऊसाहेब गुलदगड

Loading

सावित्रीबाई फुले विद्यापीठाने २०२३ ची दिनदर्शिका ताबडतोब मागे घ्यावी- महाराष्ट्र भूषन सचिन भाऊसाहेब गुलदगड

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा स्मृतीदिन चुकिच्या तारखेला छापनार्या अधिकार्यांवर कडक कारवाई करावी,त्यांनी जाहिर माफी मागावी.-महाराष्ट्र भूषन सचिन भाऊसाहेब गुलदगड

नगर -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२३ च्या अधिकृत दिनदर्शिकेतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतीदिन चुकिच्या तारखेला छापलेला आहे. तरी सदर चुक करणार्या अधिकार्यांवर कडक कारवाई करावी,त्यांनी जाहिर माफी मागावी व हि दिनदर्शिका (कॅलेंडर) ताबडतोब मागे घ्यावी असे आशयाचे पत्र नुकतेच श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कुलगुरुंना पाठवले आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या नावाने जे विद्यापीठ चालते त्या ज्ञानजोती सावित्रीबाईं यांची मृत्यूची तारीख 10 मार्च 1897 असताना विद्यापीठाच्या अधिकृत कॅलेंडरमध्ये ती 3 मार्च दाखवण्यात आली आहे.
ही मोठी घोडचूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी व त्यांनी जाहीर माफी मागावी तसेच हे कॅलेंडर ताबडतोब मागे घ्यावे.
अन्यथा सावित्रीबाई फुले विद्यापीठावर श्री संत सावता माळी युवक संघाचा धडक मोर्चा निघेल व कुलगुरुना घेराव घालण्यात येईल. असा इशारा श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *