1 min read

अमळगाव केंद्राची दहावीची सहविचार सभा संपन्न…

Loading

अमळगाव केंद्राची दहावीची सहविचार सभा संपन्न…

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)- अमळगांव केंद्राची दहावीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये सहविचार सभा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्र संचालक व निंभोरा हायस्कूलचे मुख्याध्यापक बी.एस चौधरी होते.
उदया होणाऱ्या दहावीच्या परीक्षेच्या संदर्भात सविस्तर माहिती सांगत पर्यवेक्षक यांनी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती सांगितली.केंद्रावर पर्यवेक्षक सह कोणीही भ्रमणध्वनी आणू नये,ज्यांचे सुपरवीझन असेल त्यांनीच यावे,केंद्रावर गर्दी करु नये परीक्षा शांततापुर्ण वातावरणात पार पाडावी असे सांगितले.
व्यासपीठावर केंद्रसंचालक बी.एस.चौधरी, ,मुख्याध्यापक व्हि.एन.चव्हाण,एम.डी.पिंगळे,
भाऊसाहेब संजय गोसावी,बालाजी माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक
संजीव पाटील,दोधवद हायस्कूलचे मुख्याध्यापक सैदाणे ,जे.पी.पवार होते.
सहविचार सभेला देवगांव देवळी,पिंपळी,गांधली पिळोदे,निभोंरा,दोधवद,पिंगळवाडे,
अमळगाव ,या शाळेतील पर्यवेक्षक शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *