मुलांना विविध कौशल्यात प्रविण करणारे शिक्षक उमेश मनोरे पुरस्काराने सन्मानीत !!
![]()

मुलांना विविध कौशल्यात प्रविण करणारे शिक्षक उमेश मनोरे पुरस्काराने सन्मानीत !!
अमळनेर तालुक्यातील किसान विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील उपक्रमशील शिक्षक मा. उमेश मनोरे सर यांना कला व क्रीडा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.मा. उमेश मनोरे हे आपल्या शाळेत नेहमी मुलांच्या हितावह कार्यक्रम घेत असतात. स्वतः विविध प्रशिक्षणाला जाऊन जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करून शाळेच्या मुलांसाठी सृजनशील, प्रयोगशील, गुणवत्तापूर्ण कार्यक्रम घेत असतात.कामाशी प्रामाणिक, सचोटी,सर्वांना न्याय देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जातात.जी. एस. हायस्कूल अमळनेर ला झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार वितरण जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्री पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन खा. शि. मंडळ अध्यक्ष मा. हरी भिका वाणी यांच्या हस्ते झाले. या शिक्षकांच्या गुणगौरव करण्यात आलेल्या कार्यक्रमात खा.शि. मंडळ उपाध्यक्ष मा.योगेश मुंदडा हे होते. शिवजयंतीच्या सुंदर पर्वावर हा सोहळा पार पडला. हे एकूण 33 पुरस्कार राज्य पुरस्काराच्या रूपात वाटप करण्यात आले. सदर पुरस्कारासाठी शाळेत मेहनत घेणाऱ्या कृतीशील शिक्षकाचा सन्मान झाला. मा. उमेश मनोरे सर खऱ्या अर्थाने मुलांचे बौद्धिक मनोरे उंच करण्याचे काम करित आहेत. ब्रिटीश कौन्सिल उपक्रमात ते सक्रिय होते. इंग्रजी ग्रामर वर्ग ते आपल्या शाळेत चालवितात. मतदान साक्षरता करण्यावर शाळेत उपक्रम घेतात. हा कार्यक्रम कला व क्रीडा शिक्षक समन्वय समिती व अमळनेर तालुका क्रीडा समितीच्या सयुक्तिक प्रयत्नाने संपन्न झाला. प्रमुख पाहुणे नगरपालिका उपाधिकारी संदिप गायकवाड,डॉ. अनिल शिंदे, शाम अहिरे, प्रदीप अग्रवाल तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. अमळनेर खा. शि. मंडळ सदस्य व तालुका क्रीडा मंडळ अमळनेर याचे सर्व सभासद व अध्यक्ष उपस्थित होते.आयोजनात विशेष भूमिका असलेले हेमंत भदाणे व शाळचे मुख्याध्यापक ठाकुर सर उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. वसुंधरा लांडगे तर आभार सुनिल वाघ यांनी मानले.

