1 min read

सौ. आर.एम. ताडे मॅडम यांची सेवापुर्ती————! !!

Loading

सौ. आर.एम. ताडे मॅडम यांची सेवापुर्ती————! !!

अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. आर. एम. ताडे यांची 28 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदीर्घ सेवेतून सेवापूर्ती झाली. त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी सौ. आर.एम. ताडे मॅडम आणि त्यांचे पती श्री मोहन भगवान ताडे सर तसेच मुलगा आकाश ताडे यांचा शाळेच्या वतीने भेटवस्तू, स्नेहवस्त्र शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक संदीप पवार सर होते. सदर प्रसंगी सेवापुर्ती निमित्ताने मनोगत व्यक्त करताना सौ. बी. एस. चव्हाण मॅडम यांनी विचार कथन केले की,सौ.ताडे मॅडम आणि मी सोबतच या शाळेत सेवेत हजर झालो. आणि तेव्हापासून ते आज तागायत एकमेकांच्या सुखदुःखात, शैक्षणिक कार्यात आणि सहवासात तीन दशक कसे निघून गेले ते स्मरणात राहण्यासारखे आहेत. तसेच श्री पी.एम. ठाकरे सर यांनी ‘ शाळा, शिक्षक व शिक्षण ही त्रिसूत्री आणि सेवानिवृत्ती ‘ याविषयी सविस्तर विचार आणि भावना व्यक्त केल्या. सदर प्रसंगी एस.एस.तेले ,सी.डी. निकम मॅडम तसेच डी.एस. माळी,ए.पी .जाधव एम. एस. सुशीर, वाय .जे .पाटील डी. एस. कारले आदी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री डी. ए. सोनवणे यांनी केले. आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चतुर्थ कर्मचारी अशोक सैंदाणे यांनी मोलाचे सहकार्य केले. तदनंतर सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले. आणि सर्व शिक्षक -शिक्षिका मुख्याध्यापक यांच्यासाठी स्नेहभोजनाचा आनंद घेण्यात आला. मुख्याध्यापक पवार सर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांच्या सेवानिवृत्ती विषयी आणि भावी जीवनातील वाटचालीविषयी मनोभावे सदिच्छा देऊन सेवापूर्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. सेवापूर्ती निमित्ताने श्री मोहन ताडे सर यांनी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका यांच्या सहकार्याविषयी आणि शाळेविषयी सद्भावना आणि ऋण व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *