1 min read

वृक्षमित्र योगेश शेठ घुले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Loading

वृक्ष मित्र योगेश शेठ घुले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
पत्रकार- नरेश गिरी
लोणी काळभोर- तिर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून एक लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहे या अनुषंगानेच लोणी काळभोर मधील सुप्रसिद्ध वृक्ष मित्र मा.श्री.योगेश शेठ घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बेल,उंबर,कंरज, रेट्री,चिंच, कडुलिंब, अशा जंगली वृक्षांची लागवड योगेश शेठ घुले यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी श्री.अविनाश दादा गायकवाड ,श्री.प्रवीण जाधव सर,श्री.योगेश घुले, श्री.अनिल चव्हाण, कु.वैभव काळभोर,श्री. अमित जगताप, श्री.दत्तात्रय शेंडगे, वैभवी जाधव उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे.याची पाने, काड्या वाटून, त्याचा रस उन्हाळात प्रशान केल्याने उन्हाचा त्रास होत नाही. काही लोक हा पेलाभर रस रोज पितात. त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो; सडसडीत माणसे सडसडीतच राहतात. कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत. दाताना बळकटी येते. तसेच मुळव्याध व पोटातील कृमींवर उपयोगी आहे. कडुलिंबाची वाळलेली पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही. साबण, सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन, पेस्ट यामध्ये पण कडुलिंबाचा वापर करतात.रस काढून, त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात असे प्रतिपादन अविनाश दादा गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *