1 min read

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार शशिकांत वारिशेंच्या कुटुंबियांची भेट घेऊन दिला मदतीचा धनादेश

Loading

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख व पदाधिकाऱ्यांनी

पत्रकार शशिकांत वारिशेंच्या कुटुंबियांची भेट घेऊन दिला मदतीचा धनादेश

रत्नागिरी (प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशीकांत वारिशे यांची निर्घृणपणे हत्या केल्यावर मराठी पञकार परिषदेने हे प्रकरण लावून धरल्याने आरोपीवर गुन्हा दाखल झाला व त्यांला अटकही झाली. या कुटूंबाला शासनाने मदत केली व इतरांनीही मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह वारिशे कुटुंबाची भेट घेऊन परिषदेचा मदतीचा धनादेश देऊन या कुटुंबाला आधार दिला व सर्वोतोपरी सहकार्याचा शब्द दिला.

पत्रकार शशिकांत वारिशे यांची निर्घृण हत्या झाली.. कुटुंब रस्त्यावर आलं. वृद्ध आई आणि मुलगा निराधार झाले. अशा स्थितीत त्याला मदतीचे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्रातून जवळपास दोन लाख रूपये शशिकांत यांचा मुलगा यशच्या खात्यावर जमा झाले. काही रोख रक्कम आली. मराठी पञकार परीषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमूख, विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कोषाध्यक्ष विजय जोशी, मुंबई शहराध्यक्ष राजा आदाटे, मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, राज्य उपाध्यक्ष जान्हवी पाटील, आनंद तापेकर, खलिपे, राज्य संघटक सुनील वाळुंज या सर्वांनी कशिळे गावात जाऊन शशिकांतच्या परिवाराची भेट घेतली. सांत्वन काय आणि कुणाचे करणार? मुलगा यश अजून शॉकमधून बाहेरच आलेला नाही.. आजी अंथरूणावर खिळून आहे.. आजीची जेव्हा यावेळी भेट घेतली तेव्हा तिच्या हुंदक्यांनी परिषद पदाधीकारी कोलमडून पडले. कुठल्या शब्दात या मातेचं सांत्वन करावं ते कळत नव्हते. सांत्वनाचे शब्द या कुटूंबाचे दु:खापुढे तोकडे पडले.. परिषद कायम सोबत आहे” असा शब्द देत आणि मदतीचा चेक यशच्या हाती देत या पदाधिकाऱ्यांनी निरोप घेतला. रिफायनरी विरोधी आंदोलनातले चव्हाण आणि काही कार्यकर्ते या परीषद पदाधिकाऱ्यांना भेटले. शशीकांतच्या कुटुंबियांना कायदेशीर मदत मिळावी यासाठी तेही प्रयत्न करीत आहेत. आरोपी पंढरीनाथ आंबेरकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यानं जामिनासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी होती. परिषदेचे नेते एस.एस.देशमूख यांची राजापूर मध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर बारीक नजर आहे. या कुटुंबाला सर्वोतोपरी आधार देण्याचे काम होत आहे. मराठी पञकार परीषदेने दिलेल्या या पाठबळामुळे वारिशे कुटुंबास मोठा आधार मिळाला आहे व या कुटुंबास न्याय दिल्याशिवाय परिषद स्वस्थ बसणार नाही असे ही मुख्य विश्वस्त एस. एम. देशमूख यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *