छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रभक्तांचे आधारस्तंभ- डॉ रविंद्र भोळे
![]()


छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रभक्तांचे आधारस्तंभ…. डॉ रविंद्र भोळे
उरुळीकांचन तळवाडी: महान रणनितिकार,अतुल शौर्यवान, धैर्यशील राजा छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी विजापुरच्या बलाढ्य आदिलशाही व मोगल साम्राज्यविरुद्ध लढा देउन व ऐतिहासिक संघर्ष करुन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज हे शिवभक्तांचा स्फुर्तीचा जिवंत झरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आजही शिवभक्तांचे राष्ट्रभक्तांचे आधारस्तंभ आहेत असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे अध्यक्ष डॉ मनिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट निती अयोग संलग्नित वतीने येथे व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९३जयंती निमीत्ताने कार्यक्रमांत वरील मत व्यक्त केले. उरुळी कांचन तळवाडी येथे डॉ रविंद्र भोळे ह्यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ह्या प्रसंगी तुकाराम रावबा मदने, आर्यन मदने, कार्तिक बाबर अनेक बाल शिवभक्त, सामाजिक कार्यकर्ते , महिला प्रतिनिधी, प्रतिष्ठीत नागरिक उपस्थीत होते.

