1 min read

भविष्याची गरज ओळखून अभ्यासाची दिशा ठरवा-सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील यांचे प्रतिपादन

Loading

भविष्याची गरज ओळखून अभ्यासाची दिशा ठरवा

सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील यांचे प्रतिपादन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अध्यक्षीय भाषणात आबासाहेब श्री गोकुळ पाटील मा. केंद्रप्रमुख यांनी सांगताना मी तुम्हाला निरोप नाही देणार मी तुमचे शुभचिंतन करण्यासाठी आलो.आजचा दिवस संमीश्र आहे.शाळा सोडल्याचे दुःख आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठीचा आनंद. हे सोळावे वरीस धोक्याचे नसून मोक्याचे आहे.आजची घेतलेली मेहनत उज्वल भविष्य निर्माण करेल.या काही काळ आपण अभ्यासात सातत्य ,चिकाटी,मेहनत,अभ्यासाचे योग्य नियोजन,अभ्यासाचे वेळापत्रक,अभ्यास करण्याची वेळ,सकारात्मक विचार,योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन,यशस्वी लोकांचे चरित्र वाचन,ध्येय निश्चित,प्रामाणिकपणा ,संयम विद्यार्थी काळात संधीचे सोने करा.अभ्यासात अर्जुनासारखी एकाग्रता,छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जबरदस्त आत्मविश्वास ,काळ आणि वेळ पाळा ह्या गुणांचे पालन करा तुमच्या स्वप्नांतील जीवन कोणीही राखू शकत नाही तुम्हाला जे बनायचे ते नक्की बनाल.यशस्वी व्यक्तींचा कोणाचातरी आदर्श ठेवून वाटचाल करा असे अध्यक्षीय भाषणातून सेवानिवृत्त गोकुळ पाटील यांनी नूतन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली- रंजाणे ता.अमळनेर जिल्हा जळगांव येथे मार्गदर्शन करतांना बोलत होते.

इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ संपन्न झाला.
नूतन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली- रंजाणे ता.अमळनेर जिल्हा जळगांव येथे प्रमख पाहूणे श्री विजयसिंग पवार सर व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गोकुळ आनंदा पाटील मा. केंद्रप्रमुख अंतुर्ली ता. अमळनेर जिल्हा जळगांव.मा.शिक्षक बी एस पाटील.प्रथम उपस्थित पाहूण्यांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष आबासाहेब श्री गोकुळ पाटील यांना सेवानिवृत्ती निमित्ताने शाळेकडून शाल ,टोपी,श्रीफळ आणि सफारी ड्रेस बुके देवून सत्कार केला.
प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री आर .बी .पाटील यांनी केले.प्रास्ताविकात बोलतांना म्हणाले परीक्षा ही तणावविरहीत द्या. प्रश्नपत्रिका नीट वाचून उत्तरपत्रिका लिहा.सुरवंटापासून तुम्ही फुलपांखरू झालात.आपणास प्रेरणा देणाऱ्याचे स्वप्न पूर्ण करा परीक्षेस जातांना वेळे आधी जा.जीवनात 10वी 12वीचे टप्पे आहेत पूर्ण आयुष्य नव्हे.तुमच्या यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा.तुमची बॅच फारच गुणी व हुशार होती.आमच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील.विद्यार्थी प्रतिनिधी मधून एक मुलगा एक मुलगी यांनी आपले मनोगत व्यक्त केले .आम्हाला सर व मॅडम यांनी गुणवत्तापूर्ण दर्जेदार विद्यार्थी केंद्रितअध्यापन केले.अध्ययन स्तरानुरूप गट पध्दतीने हसतखेळत अध्यापन केले आमचे हे सहा वर्षे ह्रदयात जपण्यासारखे गेले.
प्रमुख पाहुणे साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय येथील स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंह पाटील सर शिरसाळे माध्यमिक मार्गदर्शन करतांना म्हणाले की माझे विनामुल्य क्लासेस आहेत त्यात तुम्ही केव्हाही या मी तुम्हाला सदैव मार्गदर्शन करेल.तुम्हाला 10 वी नंतर भरपूर मार्ग आहेत.तुमच्या आवडीनुसार क्षेत्राची निवड करा.काहीही बना पण त्या क्षेत्रातील आयडाल बना.या पाच सहा वर्षं अभ्यासाची मेहनत घ्यावी पंचावन्न वर्षाचे फिक्स डिपाॅझीट आहे.हा तुमचा टर्निंग पाॅईंट आहे. आईवडिलांना ,सरांना आनंद होईल असे कार्य करा.सरांनी म्हणावे आमचा शाळेचा आदर्श विद्यार्थी होता.गाव ,शाळा,समाज यांना गर्व होईल असे बना.हा सेल्फीचा जमाना आहे.आपल्या सोबत सेल्फी काढण्याचा मोह इच्छा इतरांनी काढावी असे बना.उत्कृष्ट अधिकारी बना. यशवंत होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचलन श्री सुभाष पाटील यांनी केले.आभार प्रदर्शन पाटील भाऊसाहेब यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री पी डी पाटील,बी एन पाटील,सौ. एम आर पाटील,श्रीमती एस जी बैसाणे मॅडम , श्री जी बी पाटील,अजय पाटील सर्व शिक्षक बंधू ,भगिणी आणि नानाभाऊ ,संजय पाटील आणि भटू पाटील शिक्षकेतर सर्व बंधू यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *