1 min read

अनुदानासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षण मंत्री व शिक्षण सचिव यांच्याशी चर्चा

Loading

अनुदानासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षण मंत्री व शिक्षण सचिव यांच्याशी चर्चा

ठाणे ( मनिलाल शिंपी):राज्यातील विनाअनुदानित, त्रुटी पूर्तता, अंशतः अनुदानित शाळांना अनुदान देण्यासंदर्भात 6 फेब्रुवारी 2023 चा शासन निर्णय जाहीर झाला होता, त्यात अनेक अटी शर्ती आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बांधव हवाल दिल झाले होते. त्याकरता आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी काल शिक्षण संचालक पुणे यांची भेट घेऊन पुढे कशा पद्धतीमध्ये कारवाई केली जाईल याची माहिती घेतली होती,
त्याकरता आज स्वतःची तब्येत ठीक नसताना सुद्धा ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी सकाळी माननीय शिक्षण मंत्री माननीय श्री दीपकजी केसरकर साहेब यांची रामटेक बंगल्यावर भेट घेतली तसेच शिक्षण सचिव श्री देओल साहेब यांची भेट घेऊन*
तपासण्या रद्द कराव्यात, 22-23 संच मान्यता तयार नाही , त्यामुळे अनुदान वितरणाला त्रास होईल, निधी लॅप्स होऊ शकतो, काम लांबणीवर जाऊ शकते इत्यादी विषयांवर चर्चा केली*
सदरच्या अटी शर्ती रद्द करून शिक्षकांना न्याय द्यावा अशी विनंती केली, त्यानुसार शिक्षण सचिव देओल साहेब. यांनी आश्वासित केले की, कोणत्याही शाळेच्या तपासण्या होणार नाहीत, परंतु आधार कार्ड नुसार विद्यार्थ्यांची पडताळणी होईल, तसेच ज्या शाळांना अनुदान द्यायचे आहे, त्यांना प्राधान्याने आधार कार्ड पडताळणीसाठी त्वरित दोन ते तीन दिवसात संच मान्यता दिली जाईल, कोणताही निधी परत जाणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे, तसेच निधी वितरण करताना अडचण आल्यास ऑफलाइन पद्धतीने सुद्धा पगार अनुदान दिले जाईल*
आता सर्व शाळांनी काळजी न करता आपल्या शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड उपलब्ध कसे राहतील ते पाहावे तसेच मिसम्याच असलेले आधार कार्ड जुळवण्याची सोय सुद्धा केली जाणार आहे, हे सर्व काम जलद गतीने फास्ट होणार आहे , सूचना तात्काळ अधिकाऱ्यांना देतो असे पुणे शिक्षण सचिव देओल साहेबांनी सांगितले*
सोबत शिक्षण संघर्ष समितीच्या अध्यक्षा सौ संगीता शिंदे मॅडम , प्राध्यापक सतीश शिरसाट सर अन्य शिक्षक उपस्थित होते.विष्णू विशे*
संपर्कप्रमुख यांच्याकडून अशी माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *