1 min read

कवी रमेश पवार यांच्या ‘गावगाड्यांच्या पानझडीचे संदर्भ’

Loading

कवी रमेश पवार यांच्या ‘गावगाड्यांच्या पानझडीचे संदर्भ’

काव्यसंग्रहास प्रतिष्ठेचा स्व. लताताई रामटेके पुरस्कार प्रदान

अमळनेर- येथिल सुप्रसिद्ध कवी रमेश पवार यांना गावगाड्यांच्या पानझडीचे संदर्भ या काव्य संग्रहासाठी यवतमाळ येथील ‘स्वर्गीय लताताई रामटेके पुरस्कार’ एका भव्य समारंभात अध्यक्ष डॉ. प्रा. मा. बाळकृष्ण सरकटे आणि रामटेके परिवार यांचे हस्ते कवी रमेश पवार यांना नुकताच प्रदान करण्यात आला. पुरस्कारासाठी परीक्षणासाठी एकूण 69 काव्यसंग्रह प्राप्त झाले होते. यावेळी परीक्षक सौ. भावना पवारांनी सांगितले की, काव्यसंग्रह वाचतांना खूप भरभरून काय पण खूपदा मी रडले देखील! तर मनोगत व्यक्त करतांनाही त्या खूप भावूक झाल्या होत्या. कवी व आकाशवाणी अधिकारी परीक्षक जयंतकुमार शेटे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की अंतरीची ओल असणारा कविता संग्रह असून या काव्य संग्रहाचे भविष्य खूप उज्ज्वल आहे!’ अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. सरकटे यांनी कोण कुठला कवी पण त्यांची कविता मनाला भिडणारी. काहीच ओळख संदर्भ नसतांना या कवीची कविता ते शब्द भांडार, प्रतिमा आणि प्रतिभेचा आविष्कार म्हणून निरपेक्ष निर्मळ मनाचं परीक्षण आम्हा सर्वांना खुप खूप भावलं असे सांगितले.सत्कारास उत्तर देतांना कवी रमेश पवार यांनी सांगितले की,मी जे सोसलं, भोगलं, अनुभवलं तिच माझ्या कवितेची व्याख्या झाली. बापाचं कष्ट, राबणाऱ्या बापाची घुसमट, माझा बाप हाच या काव्यसंग्रहाचा नायक आहे. प्रस्तावना गझलकार विनय मीसासे यांनी केली तर आभार नरेंद्रचंद्र रामटेके यांनी तर सूत्रसंचलन निलध्वज कांबळे यांनी केले. म.सा.प.चे अध्यक्ष नरेंद्र निकुंभ, म. वा. मंडळ अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, पूज्य साने गुरुजी ग्रंथालय अध्यक्ष दिलीप सोनवणे प्रकाश वाघ,शिव बहुद्देशीय प्रतिष्ठाण तर्फे रणजित शिंदे, प्रा.लिलाधर पाटील यांनी तर प्रा.र.का. केले ग्रंथालय अमळनेर कार्यकारी मंडळ आणि परिसरातील रसिकांनी रमेश पवार यांचे अभिनंदन केले आहे.अमळनेर तालुक्यातील करणखेडे सारख्या ग्रामीण भागातून धडपड करीत उत्तुंग झेप घेत कवी रमेश पवार यांनी खान्देशात साहित्य चळवळ, ग्रंथालय चळवळ, साहित्य संमेलन, प्रा. र.का. केले (ग्रंथालय उपाध्यक्ष) नाट्यसंमेलनासह म.सा.प. कार्याध्यक्ष, म.वा. मंडळ उपाध्यक्ष, साने गुरुजी ग्रंथालय आदी संस्थांवर पदे भुषवित आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *