1 min read

जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंकज चौधरी यांच्या आंदोलनाची मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी घेतली दखल…

Loading

अमळनेर :- येथील प्रभाग क्र.9 मधील रस्त्याचा मुळे नागरिक, व्यापारी बांधव हैराण झाले आहेत.
त्यास अनुसरून जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंकज पंडीत चौधरी यांनी मुख्याधिकारी श्री प्रशांत सरोदे यांना दि.16/02/2023 रोजी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. व्यापारी बांधवाना होणारा त्रास व नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत
त्यास अनुसरून दि.20/02/2023 रोजी मुख्याधिकारी सरोदे यांनी चौधरी यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास सूचना दिल्या आहेत.तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासित केले होते.
आज 21/02/2023 प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यात आल्याने पंकज चौधरी यांनी प्रभाग क्र.9मधील नागरिक व व्यापारी बांधवांचा वतीने सरोदे साहेबांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *