अनुदानाच्या जीआर साठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांची शिक्षण संचालक यांच्यासोबत बैठक संपन्न
![]()
अनुदानाच्या जीआर साठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांची शिक्षण संचालक यांच्यासोबत बैठक संपन्न
ठाणे कल्याण( मनिलाल शिंपी):आज दिनांक 20/02/23 रोजी शिक्षण संचालक कार्यालय पुणे येथे सन्माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी 6 फेब्रुवारी 2023 रोजी 20 टक्के वाढीव टप्पा विनाअनुदानित शाळा, त्रुटी व अंशतःअनुदानित शाळांच्या संदर्भामध्ये जो शासनादेश आलेला आहे. त्या शासनादेशातील जाचक अटी या कशा प्रकारे दूरकरता येतील, यासाठी शिक्षण संचालक माननीय श्री कृष्णकांत पाटील साहेब , तसेच उपसंचालक, प्रशासन अधिकारी , अन्य अधिकाऱ्यांशी अतिशय विस्तृतपणे चर्चा केली. सलग चार तास चर्चा केली, शिक्षण संचालकांनी वीसी मध्ये राज्यातील सर्व उपसंचालकांना शासन आदेशाप्रमाणे तयारी करून ठेवा असे आदेश दिलेले आहेत, मात्र अजून कोणत्याही प्रकारचे कार्यवाही सुरू झालेले नाही , याद्या लवकरात लवकर घोषित व्हाव्या, जीआर मधील अटी दूर कराव्यात,याकरता ज्ञानेश्वर म्हात्रे सर उद्या 21 फेब्रुवारी 2023 ला मंत्रालयामध्ये जाऊन शिक्षण मंत्री सन्माननीय केसरकर साहेब यांच्याशी चर्चा करून यावरती तोडगा काढून लवकरात लवकर महाराष्ट्रातील सर्व अंशतः तथा विनाअनुदानित अवघोषित आणि त्रुटी पात्र शाळांना अनुदानाचा टप्पा मिळावा यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहेत याद्या घोषित करण्यासाठी विनंती करणार आहेत*.


♦️खालील मुद्दे सुद्धा मीटिंगमध्ये घेण्यात आले*
अनेक दिवसापासून प्रलंबित संच मान्यता दुरुस्त करून त्वरित मिळाव्या त्याकरता एक तास चर्चा केली, आठवड्याच्या आत पंच मान्यता दुरुस्त करण्यासंदर्भात आग्रह धरला, त्यानुसार एक आठवड्यात संच मान्यता दुरुस्त करून देण्याचे आश्वासन शिक्षण संचालक यांनी दिलेअनेक दिवसापासूनन प्रलंबित विविध प्रकारची देयके त्वरित मंजूर व्हावीत यासाठी पण चर्चा केली व यादी देण्यात आली , कार्यालयात प्रलंबित असलेल्या सर्व बिलेे मंजूर करावीत असे सांगितले
सातवा वेतन आयोगाचे 2 आणि 3 हप्ता काही जिल्ह्यांना दिलेला नव्हता तो त्वरित मिळाला पाहिजे.*
पुणे जिल्ह्यातील दोन महिला शिक्षकांचे पगार तीन वर्षापासून बंद होते, पाच मिनिटाच्या आत पगार सुरू करण्याचे आदेश उपसंचालकांकडून काढून दिले
तसेच उपस्थित अन्य वैयक्तिक कामे काही शिक्षक घेऊन आले होते ती कामे त्वरित सोडवण्यात आली
याप्रसंगी म्हात्रे सरांबरोबर सुनील जगताप सर ,प्रवीण लोंढे, सर प्रकाश मगर सर ,ज्ञानेश्वर शेळके सर खंडेराव जगदाळे ,विवेक गुंजेगावकर सर ,नांदगावकर मामा ,सचिन तोत्रे सर ,प्रदीप वीर सर ,सुजाता खट्टे मॅडम ,नरेंद्र घोडके सर, अजित कीर्तने सर, रामदास वायबसे सर,अशा प्रकारे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

