“BVM pe प्रायोजित कॉलेज कट्टा प्रस्तुत निबंध स्पर्धेत बालपण स्कूल पानोडी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश”
![]()

” BVM pe प्रायोजित कॉलेज कट्टा प्रस्तुत निबंध स्पर्धेत बालपण स्कूल पानोडी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश”
BVM pe आयोजित कॉलेज कट्टा प्रस्तुत मोबाईल शाप की वरदान, मोबाईल गेम्स की मैदानी खेळ या दोन विषयावर आयोजित निबंध स्पर्धेत बालपण स्कूल पानोडी च्या वरद शिवाजी मुंढे द्वितीय क्रमांक, मृण्मयी संदिप गाडेकर, आर्यन नानासाहेब कदम तृतिय क्रमांक (विभागून), यश मंगेश तांबे, स्मित संतोष गोडगे उत्तेजनार्थ विभागून सी. ए. पवनकुमार दरक साहेब (चेअरमन, आय. सी. ए. आय, अ. नगर) , मा.आजिनाथ हजारे(चेअरमन,ज्योती क्रांती मल्टिस्टेट अ. नगर) यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. सदर प्रसंगी बिव्हीएमचे अभिजित हजारे, विजय डोळे, परिक्षक- राऊत सुनिल, निसर्ग चित्रकार विठ्ठल पुरी, निसार पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
आजची पिढी मोबाईल च्या अतिवापरामुळे विविध समस्यांना,आजारांना सामोरे जात आहे. सततच्या मोबाईल वापराने खेळापासून दूर विद्यार्थी चालला आहे. हे ओळखून अभिजित हजारे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बालपण स्कूल चे ७५ विद्यार्थी सदर स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेतून बालपण च्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून यातून प्रेरणा ही मिळविली. वर्षभरात बालपण स्कूल च्या विद्यार्थ्यांनी विविध राज्यस्तरीय वक्तृत्व,निबंध,नाट्यछटा, आतरराष्ट्रीय चित्रकला,हस्ताक्षर, इंग्लिश आॅलंपियाड,मॅथ आॅलंपियाड, सायन्स आॅलंपियाड, पत्रलेखन, क्रिडा, पर्यावरण विषयक स्पर्धा यात भरपूर बक्षिसाची कमाई विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल बालपण स्कूल चे सर्व शिक्षक वर्ग व बालपण च्या प्रमुख सौ सोनाली मुंढे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

