डोंबिवली स्काऊट गाईड संस्थेचा चिंतन दिन सोहळा व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २०२३ मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न!
![]()



डोंबिवली स्काऊट गाईड संस्थेचा चिंतन दिन सोहळा व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २०२३ मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न!
ठाणे,डोंबिवली दि.२०(प्रतिनिधी ) डोंबिवली
भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्था आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, रोटरियन ॲड.शिरीष देशपांडे,यांच्या अध्यक्षतेखाली,स्काऊट गाईड ठाणे जिल्हा संघटक किरण लहाने, रोटरीचे अध्यक्ष खरोटे , दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.किशोर बळीराम पाटील, स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ.दिनेश भाई ठक्कर, समाजसेवक श्री. किशोर अढळकर,यांच्या प्रमुख उपस्थितीत, दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी चिंतन दिन मेळावा व पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला .सदर कार्यक्रमास एकूण १७ शाळांनी सहभाग घेतला त्यामध्ये एकूण ४१३ स्काऊट व गाईड व ३४ स्काऊट मास्टर यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता सुरू करण्यात आली .सर्वप्रथम ध्वजारोहण करून ध्वज गीत व स्काऊट गाईड प्रार्थना घेण्यात आली .त्यानंतर उपस्थित सर्व सतरा शाळेच्या स्काऊट आणि गाईड यांनी संचालन केले व ध्वजास सलामी देण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थित स्काऊट आणि गाईड यांना आपल्या स्पर्धा सुरू करण्यास परवानगी दिली. गॅजेट व तंबू स्पर्धेमध्ये एकूण सात शाळेने सहभाग घेतला. बँड स्पर्धेमध्ये एकूण चार शाळा सहभागी झाल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये एकूण १६ शाळांनी सहभाग घेतला त्यामध्ये सामूहिक नृत्य मध्ये १६ व सामूहिक गायनामध्ये दोन शाळेने सहभाग घेतला .सर्व स्पर्धा झाल्यानंतर.पारितोषिक वितरण समारंभ सुरू करण्यात आला.
सर्वप्रथम लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल व सरस्वती प्रतिमा पूजन करून हार अर्पण करण्यात आला व दीप प्रज्वलन करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभागाचे अध्यक्ष श्री.दिनेश भाई खरोटे ,सेक्रेटरी श्री.राजेश जी पटेल, भावी प्रेसिडेंट श्री. महेंद्र भोईर ,माजी अध्यक्ष श्री. अवधेश उपाध्याय, रोटरीयन श्री.शिरीष देशपांडे ,डॉ.दिनेश बलवंतराय ठक्कर संचालक स्वामीनारायण हॉल,डॉ.किशोर बळीराम पाटील संपादक दैनिक स्वराज्य तोरण, डॉ. मनीलाल रतिलाल शिंपी अध्यक्ष मानव सेवा हीच ईश्वर सेवा,माधुरी प्रधान मुख्याध्यापिका ग्रींस इंग्लिश स्कूल, सौ.मोहिनी मॅडम मुख्याध्यापिका ग्रीन्स इंग्लिश स्कूल प्राथमिक, तसेच जिल्हा संघटक आयुक्त स्काऊट श्री. किरण लहाने ,डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेचे अध्यक्ष श्री.अशोक जगताप, सचिव श्री जगदीश उगले,उपाध्यक्ष श्री.एकनाथ चौधरी, उपाध्यक्ष सौ.विजयश्री मोकाशी, खजिनदार श्री.राजू घुले, उपाध्यक्ष श्री.राजेंद्र शेटे,सल्लागार श्री.गोपाळ सूर्यवंशी,सल्लागार श्री.नरेंद्र राणे , सल्लागार श्री.आर के महाजन, स्काऊट मास्टर हरित मेहता , स्काऊट मास्टर चंद्रकांत खैरनार, स्काऊट मास्टर श्री.प्रशांत पाटील, सहाय्यक सचिव श्री.जितेश पाटील,गाईड कॅप्टन दीपसिखा जैन ,गाईड कॅप्टन अनुराधा द्विवेदी ,स्काऊट मास्टर केतन,स्काऊट मास्टर बाळू मोरे,स्काऊट मास्टर श्री. खैरे ,तसेच इतर स्काऊट मास्टर गाईड कॅप्टन उपस्थित होते. रोट्रियन श्री.शिरीष देशपांडे यांनी उपस्थित सर्व स्काऊट व गाईड यांना मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेचे सचिव श्री जगदीश उगले व उपाध्यक्ष श्री एकनाथ चौधरी यांनी केले. प्रास्ताविक स्थानिक संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक जगताप यांनी केले उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आला त्यामध्ये स्थानिक संस्थे मध्ये वर्षभरामध्ये जे विविध उपक्रम साजरे केले जातात त्या सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
शुभांगी देसाई,आय ई एस चंद्रकांत पाटकर विद्यालय,
आशा निळकंठ कोळी,
स.है.जोंधळे विद्यामंदिर मराठी माध्यमिक विभाग डोंबिवली,
हरित बालकृष्ण मेहता सेंट जोसेफ हायस्कूल,
निवृत्ती खराटे
टिळक नगर विद्यामंदिर डोंबिवली पूर्व,यांना आदर्श स्काऊट मास्टर गाईड कॅप्टन पुरस्कार निवृत्त स्काऊट मास्टर मुख्याध्यापकअंकुर आहेर,
निवृत्त मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यामंदिर डोंबिवली
राजेंद्र शेटे,
स्काऊट मास्टर सिस्टर निवेदिता इंग्लिश मिडीयम स्कूल डोंबिवली यांनाही गौरवण्यात आले.
डॉ .दिनेश बळवंतराय ठक्कर.संचालक, स्वामीनारायण हॉल कल्याण पश्चिम यांचाही अन्नदाते म्हणून विशेष सत्कार करण्यात आला.
भारत स्काऊट गाईड साठी विशेष प्रसिध्दी देणारे , दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ .किशोर बळीराम पाटील. आजीव सभासद म्हणून
डॉ . मनीलाल शिंपी
अध्यक्ष मानव सेवा हीच ईश्वर सेवा प्रा.अनंत उत्तेकर,
स्काऊट मास्टर रा. वी .वेरुळकर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज डोंबिवली.यांचाही विशेष सन्मान त्यावेळी करण्यात आला. यावेळी वर्षभरात ज्या ज्या स्पर्धा घेण्यात आल्या त्या सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात करण्यात आले सर्व मान्यवरांनी पारितोषिक पटकविलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गुणगौरव करून अभिनंदन केले, त्यामध्ये खालील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
निबंध स्पर्धा हिंदी व मराठी
प्रथम क्रमांक कुमारी जागृती संतोष यशवंतराव,शिवाई बालक मंदिर डोंबिवली पूर्व.द्वितीय क्रमांक
कुमार दुर्गेश विजय सोनी
शाह जयेश मोनजी इंग्लिश हायस्कूल डोंबिवली पूर्वतृतीय क्रमांक
कुमारी पूर्वा प्रशांत तावडे
प्रकाश विद्यालय डोंबिवली पूर्व
उत्तेजनार्थ
कुमारी पल्लवी संजय टाकळे
सेंट जोसेफ हायस्कूल डोंबिवली पूर्व
परीक्षक*
सौ.सोनाली राहुल वैद्य
प्रकाश विद्यालय डोंबिवली
निबंध स्पर्धा इंग्लिश,प्रथम क्रमांक*
कुमार स्वरूप महेश आंगणे,सेंट जोसेफ हायस्कूल डोंबिवली पूर्व,
द्वितीय क्रमांक
कुमारी तनुश्री अमोल गायकवाड आदर्श इंग्लिश स्कूल गोग्रासवाडी डोंबिवली पूर्व,तृतीय क्रमांक
कुमारी ऐश्वर्या राऊत
सेंट जोसेफ हायस्कूल डोंबिवली पूर्व,
उत्तेजनार्थ,कुमारी ईशा प्रशांत लोंढे
शाह जयेश मोनजी न्यू इंग्लिश सेकंडरी हायस्कूल डोंबिवली पूर्व
परीक्षक संजय मधुकर टोगरे
प्रकाश विद्यालय डोंबिवली
वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक कुमारी सुरवी शेट्टी
प्रकाश विद्यालय
द्वितीय क्रमांक
कुमारी स्वरा महाडधोळकर
ओमकार इंग्लिश मीडियम स्कूल डोंबिवली पूर्व
द्वितीय क्रमांक
कुमार देवेन दरोळे
आदर्श इंग्लिश स्कूल गोग्रासवाडी डोंबिवली पूर्व,तृतीय क्रमांक*
कुमारी तनवी अंबुलकर प्रकाश विद्यालय डोंबिवली पूर्व,आराध्या गोळगावकर
प्रकाश विद्यालय डोंबिवली पूर्व
कुमार हर्षित यादव
शहा जयेश मोनजी न्यू इंग्लिश सेकंडरी स्कूल डोंबिवली पूर्व,यांना उत्तेजनार्थ पारितोषिक वितरण करण्यात आले. परीक्षक म्हणून.प्रियांका दवे
प्रकाश विद्यालय डोंबिवली पूर्व
प्रतिभा जाधव
ओमकार इंग्लिश मीडियम स्कूल यांनी चोखपणे जबाबदारी निभावली.
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचाही यावेळी करण्यात सत्कार आला.
.सुनील तिळगुळकर पोस्ट ऑफिस ॲड. शिरीष देशपांडे गंगाधर पुरंदरे समाजसेवक, धोंडू मोरे पोलीस ऑफिसर.घनश्याम रंगनाथ मालवी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांचा समावेश आहे,
सुवर्ण महोत्सवी” वर्षानिमित्त विशेष सहकार्य केल्याबद्दल डोंबिवलीतील सर्व शाळेच्या मुख्याध्यापक , स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन यांचे सचिव जगदीश उगले
डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्था सर्व पदाधिकारी यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.

