प्रकाश शेठ काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
![]()

प्रकाश शेठ काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
लोणी काळभोर- तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, वनविभाग आयोजित एक लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहे या अनुषंगानेच चिंतामणी नर्सरी चे मालक मा.श्री. प्रकाश शेठ काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त कदंब वृक्षांचे रोपण प्रकाश शेठ काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी वन विभाग अधिकारी श्री.अर्जुन कचरे साहेब, ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री.अमित जगताप, ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष श्री.दत्तात्रय भाऊ शेंडगे, दत्तात्रय भाऊ काळभोर, बाबासाहेब यादव, जीवन जाधव, बिरूदेव भास्कर, तुळशीराम कोंढारी, रंजना कोळपे उपस्थित होते.
निसर्गप्रेमींना भुरळ पाडणारा कदंब वृक्ष अत्यंत राजस दिसतो. निसर्गात पूर्ण वाढलेल्या वृक्षाची उंची ३० मीटर पर्यंत जाते. रोप लावल्यापासून पहिले सहा ते आठ वर्षापर्यंत वाढ भर-भर होते, मग स्थिरावते आणि २० वर्षांपर्यंत पूर्ण होते. वृक्ष दीर्घायुषी असून, शंभर वर्षं जगू शकतो. कदंबाच्या ताठ राखाडी रंगाच्या बुंध्यावर काटकोनात पसरलेल्या फांद्यांमुळे वृक्षाचा आकार छत्रीसारखा दिसतो. पानगळीचा वृक्ष असूनही संपूर्ण निष्पर्ण वृक्ष आढळत नाही, कारण याची पाने एकदम गळत नाहीत. ही पाने आंब्याच्या आकाराची पण जरा रुंद असतात. पुढून हिरवीगार व तुकतुकीत असतात अन् मागच्या बाजूने काहीशी फिकट लवयुक्त असतात. पानांवरच्या शिरा उठून दिसतात. पण वृक्षाची खरी मजा त्याच्या फुलांमध्ये आहे. संस्कृत काव्यात कदंब फुलण्याचा संबंध पावसाशी जोडला आहे. ढगांचा गडगडाट ऐकल्यावरच कदंब फुलतो, असे म्हणतात अशी माहीती ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी दिली.

