मराठी लाईव्ह न्युजचे धरणगांव प्रतिनिधी पी डी पाटील यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून सत्यशोधक पद्धतीने केला गृहप्रवेश !…
![]()
पी डी पाटील यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून सत्यशोधक पद्धतीने केला गृहप्रवेश !…
रयतेच्या मनावर राज्य करणारे एकमेव राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज – अरविंद खैरनार [ संस्थापक अध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य ]




वास्तु बांधणाऱ्या ३० कामगारांचा टोपी ,रूमाल व महापुरुषांचे अनमोल ग्रंथ देऊन सन्मान !…..
प्रतिनिधी –
धरणगांव – शहरातील कृष्ण गीता नगर येथे कुळवाडीभूषण छत्रपती शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी डी पाटील यांनी सहपत्नीक सत्यशोधक पद्धतीने गृहप्रवेश केला. पुरोहित शाहीला फाटा देऊन राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या विधीनुसार विधीकर्ते सत्यशोधक भगवान रोकडे यांच्या हस्ते सार्वजनिक सत्यधर्म पद्धतीने विधी करण्यात आला. खंडेरायाची तळी भरून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सार्वजनिक सत्यशोधक गृहप्रवेश कार्यक्रमाचे प्रास्ताविक एच.डी.माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मराज पुंडलिक पाटील होते. प्रमुख व्याख्याते सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार होते. प्रमुख अतिथी सत्यशोधक समाज संघ राज्य कार्यकारीणी सदस्य विश्वास पाटील, गट शिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, सत्यशोधक जिल्हा समन्वयक विजय लुल्हे, मा.नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, काँग्रेस प्रदेश सचिव डी जी पाटील, माजी पंचायत समिती सदस्य जगन्नाथ महाजन, सरपंच दगडू गणपत पाटील, डॉ.विलास पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रमुख वक्ते अरविंद खैरनार यांचा परिचय एच.डी.माळी यांनी करून दिला त्याच्यानंतर संयोजक पी.डी.पाटील सरांनी सन्मानपूर्वक खैरनार यांना फुले पागोटे प्रदान केले. विचार मंचावरील सर्व मान्यवरांचा अनमोल ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. विधीकर्ते भगवान रोकडे यांनी सत्यशोधक समाजाची प्रार्थनेचे सामूहिक वाचन केले. प्रमुख वक्ते सत्यशोधक अरविंद खैरनार यांनी” शिवरायांच्या रणनिती ऐवढेच स्वराज्यातील जीवन मूल्यांचे दर्शन बहुजनांना घडवून देणारे पहिले द्रष्टे साहित्यिक महात्मा जोतिबा फुले होते.”असे मार्मिक उदाहरण देऊन खैरनार मार्गदर्शनात पुढे म्हणाले की,’ मेंदूची वाढ व विकास करण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही.महात्मा फुले यांनी प्रथमत: शिवरायांची रायगडावरील समाधी कशी शोधून काढली आणि प्रेरणादायी शिवरायांचा पोवाडा लिहीला याची प्रेरक माहिती दिली. अज्ञानाचा फायदा घेऊन भटजींनी धर्मसत्तेच्या आडून पिढ्यानुपिढ्या आर्थिक शोषण केले. महात्मा फुले यांनी गुलामगिरी व शेतकर्यांचा आसूड ग्रंथ लिहून धर्मसत्त्तेची लक्तरे काढून सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथलेखनाद्वारे नितीशास्त्र देऊन बहुजनांना जागृत करून त्यांना हक्क मिळवून दिले. काही सनातन्यांनी कटकारस्थानपूर्वक महात्मा फुले फक्त दलितांचे कैवारी आहेत अशी संकुचित प्रतिमा महात्मा फुलेंची केली. राष्ट्रभक्त, क्रांतिकारी लेखक, तत्वनिष्ठ निर्भय सामाजिक कार्यकर्ता, शिक्षणतज्ज्ञ, इतिहास संशोधक, प्रयोगशील शेतकरी, प्रतिष्ठीत बांधकाम व्यावसायिक हे महात्मा फुले यांचे गुणवैशिष्ट्ये सहेतुक ब्राह्मण वर्गाने दिशाभूल करून बहुजनांची दिशाभूल केली. ज्ञानेश्वर महाजन यांनी मनोगतात सत्यशोधक कार्यकर्ते पी.डी.पाटील सरांनी केलेल्या सत्यशोधकीय पुस्तक चळवळ व केलेल्या समाज प्रबोधनाबाबत गौरवोद्गार काढले. कु.गुंजन माळी विद्यार्थीनीने शिवरायांवर माता जिजाऊंनी केलेले संस्कार व शिवरायांनी केलेले अतुलनीय कार्य प्रभावीपणे काव्यात्मक भाषेत सांगून सर्वांची मने जिंकली. शिवजयंतीच्या औचित्याने पूज्य पिताश्री धर्मराज पाटील, मातोश्री सुंदरबाई व उभयतांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वास्तु उभे करणाऱ्या कामगारांचा हृद्य सत्कार याप्रसंगी करण्यात आला. यामध्ये प्रारंभी अभियंता अलीम शिरपूरकर, ठेकेदार नितीन चौधरी व नवनीत चौधरी यांचा सत्कार धर्मराज पाटील, भास्कर बाविस्कर, दगडू उत्तम पाटील यांच्या हस्ते टोपी, रुमाल व ग्रंथ देऊन करण्यात आला. विशेष सत्कारार्थी कामगार बांधकाम – रवि मिस्तरी, बापू मिस्तरी, संजय मिस्तरी, नितीन मिस्तरी, अनिल मिस्तरी, संतोष मिस्तरी, रतिलाल मिस्तरी, मार्बल व फ्लोरींग – महेंद्रभाई सैनी, रोहिदास भाई ,निंबा महाजन, विठोबा महाजन, प्लंबर – योगराज महाजन, गुलाब भाऊ ,चेतन महाजन
फर्निचर – प्रशांत शिरसाठ, समाधान भाऊ पेंटर – अमृत पारधी, धनराज पारधी , मुकेश पारधी अशा ३० कामगारांचा सन्मानपूर्वक सन्मान करण्यात आला. आहेर देणे -घेणे प्रथेला फाटा देऊन महापुरुषांच्या चरित्रात्मक एकूण ३०० वाचनीय पुस्तकांची सुमारे ६००० रुपयांची सन्मानपूर्वक भेट आलेल्या सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर व सर्व उपस्थित नातलक, परिवारीक सदस्य यांना भेट स्वरूपात देण्यात आले.
कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य जगन्नाथ महाजन, महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.एस.पवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, माजी अध्यक्ष अँड.बापु साहेब व्ही.एस.भोलाणे, माळी समाज अध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, माजी सचिव दशरथ महाजन, कोषाध्यक्ष व्ही टी माळी सर, सरपंच दगडू गणपत पाटील, सुकलाल महाजन, पत्रकार धर्मराज मोरे, डी एस पाटील सर, बाळू जाधव, अविनाश बाविस्कर, विनोद रोकडे, विकास पाटील, ज्ञानेश्वर भगवान महाजन,जयपाल माळी, संदीप महाजन, निलेश महाजन, सचिन महाजन, प्रकाश महाजन, विश्वनाथ महाजन, सर्जेराव महाजन, शांताराम नथ्थु पाटील, संतोष पितांबर पाटील, गोरख भास्कर पाटील, गोरख महाजन, परशुराम महाजन, महेश भावसार, विधीकर्ते शिवदास महाजन, कविराज पाटील, निलेश पाटील, प्रा.पंकज पाटील, यांसह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. स्नेह भोजनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. प्रास्तविक एच.डी.माळी व सुत्रसंचलन सुनिल कोळी तर आभार पी डी पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महात्मा फुले हायस्कूल चा संपूर्ण स्टाफ, वैचारिक मित्रपरिवार व कॉलनीवासी यांनी परिश्रम घेतले.

