शिवजयंती प्रेरणादायी उपक्रमांनी संपन्न
![]()

शिवजयंती प्रेरणादायी उपक्रमांनी संपन्न
खंडाळा : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव तसेच भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्षानिमित्त खंडाळा येथे कर्तृत्ववान व्यक्तींचा विशेष सत्कार व सुजन भारत सन्मान समारंभ संपन्न.प्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन, शिवराय वंदना आणि विद्यार्थ्यांचे लाठीकाठी प्रात्यक्षिक करून कार्यक्रमास शुभारंभ झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सामाजिक कार्यकर्ते संपतराव जाधव होते. प्रमुख उपस्थिती डॉ प्रेमिला तलवाडकर जी एस टी निरीक्षक ,श्री दीपक शिर्के,
मा सुनीती धायगुडे चेअरमन भैरवनाथ पाणीपुरवठा संस्था,
समीना शेख सामाजिक कार्यकर्त्या,साहित्यिक श्री विलास वरे
श्री प्रशांत जाधव अध्यक्ष खंडाळा तालुका पोलीस पाटील संघटना , सौ शीतल महांगरे सामाजिक कार्यकर्त्या हेमान्यवर उपस्थित होते.
सुजन फौंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जीवनामध्ये विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या महिला , पुरुषांचा विशेष सत्कार व सुजन भारत सन्मान प्रदान सोहळा संपन्न झाला . याप्रसंगी
सुजन भारत पुरस्कार २०२३ या सन्मानाने मा.शारदा भस्मे
सामाजिक कार्यकर्त्या , सौ शर्मिलानलावडे सामाजिक कार्यकर्त्या,पुणे, सौ. संगीता गोरड मुख्याध्यपिका जि प शाळा तांबवे,मा सुनीती धायगुडे चेअरमन भैरवनाथ पाणीपुरवठा संस्था, प्रा.रामलिंग सावळजकर अकलूज
श्री कैलास आटोळे मुख्याध्यापक जि प शाळा ,श्रीगणेश शेंडे उपशिक्षक ,श्री तुषार माने,सदस्य ग्रामपंचायत म्हासुरने ,श्री विद्येश खरात उपशिक्षक, श्री संदीप ननावरे सामाजिक कार्यकर्ते, यांना गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, तिरंगा वस्त्र क्रांतीज्योती काव्यसंग्रह पुस्तिका देऊन सन्मानित करण्यात आले.
सार्वजनिक जीवन जगत असताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतः चे कर्तृत्व सिद्ध करून जीवनमान उंचावले आशा कर्तृत्ववान व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात आला. शुभम पवार मराठी कॉर्नर युट्युब चॅनेल,सौ रुपाली जाधव सरपंच अतिट, सौ सविता मरगजे, सौ सुजाता बावडेकर, रुपाली जाधव उद्योजिका यांचा सत्कार करण्यात आला.
भादे येथील ग्रामपंचायत सदस्य सौ मालन चव्हाण यांनी आपल्या भावाला लिव्हर दान करून जीवदान दिले.सद्य समाज समोर एक आदर्श निर्माण केला. यांच्या कृतिशील कार्याचा आदर सन्मान म्हणून सौ चव्हाण यांचा शिवजयंती दिनी विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये दुवा म्हणून कार्य करणारे पोलीस पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात श्री प्रशांत जाधव अध्यक्ष खंडाळा तालुका पोलीस पाटील संघटना , सौ जयश्री खुंटे पोलीस पाटील भादे, यांचा सन्मान करण्यात आला.
महात्मा फुले यांनी विस्मरणात असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आणि पोवाडा लिहून सर्वप्रथम शिवजयंती उत्सव साजरा करून समस्त समाजाला सामाजिक क्रांतीची दिशा दिली. सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षा निमित्ताने म्हावशी येथील पोलीस पाटील समीर राऊत व काजल राऊत यांनी सत्यशोधक विवाह करून सद्य समाज प्रबोधन व कृतिशील कार्याबद्दल महात्मा फुले सत्यशोधक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजन संस्थांचे अजित जाधव यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्याची गौरवशाली पंच्याहत्तर वर्ष याबाबत मान्यवरांनी मनोगत व्यक्य केली.याप्रसंगी अंकुश जाधव, आदेश माने, शाहिद शेख, सुप्रिया गावडे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी मोहन बोरकर, सोमनाथ ननावरे, गणेश बोडरे व गुरुकुल विद्यालय विद्यार्थी ,शिक्षक यांचे सहकार्य लाभले. संदीप ननावरे यांनी आभार मानले.

