1 min read

माहिती आणि जनसंपर्क विभागाला बाळशास्त्री जांभेकरांचा विसर

Loading

माहिती आणि जनसंपर्क विभागाला बाळशास्त्री जांभेकरांचा विसर

ही घटना दुर्दैवी संतापजनक आणि निषेधार्ह- एस.एम. देशमुख

सिंधुदुर्ग- आद्य पत्रकार, दर्पणकार, प्रकांड पंडित बाळशास्त्री जांभेकर यांची आज २११ वी जयंती आहे.. या दिवसाचं औचित्य साधून आज सिंधुदुर्गमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री. नारायणरावजी राणे यांच्या हस्ते झालं ..देशातील मराठी पत्रकारांसाठी आजचा दिवस फार महत्वाचा असताना बथ्थड माहिती आणि जनसंपर्क विभागाला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचाच विसर पडावा ही घटना दुर्दैवी, संतापजनक आणि निषेधार्ह आहे..२० फेब्रुवारी रोजी बाळशास्त्रींचा जन्म झाला हे सरकारनंच नक्की केलं.. मग सरकारला कसा विसर पडू शकतो? या संदर्भात दिल्लीहून आयात केलेले संचालक कोणी राहूल तिडके यांना फोन केला पण मग्रूरी अशी की, त्यांनी फोनही घेतला नाही.. त्यामुळे माहिती जनसंपर्क विभाग पत्रकारितेपासून कसा दूर गेलाय हेच दिसून येते.. महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी सरकारतर्फे जाहिरात दिली जाते.. मात्र आद्य पत्रकारांची आज जयंती असताना देखील माहिती आणि जनसंपर्क विभागानं जाहिरात दिली नाही.. गेल्या वर्षी अशी जाहिरात दिली गेली होती.. यंदा नाही.. असं का व्हावं हे कळत नाही.. याचा मराठी पत्रकार परिषद तर निषेध करीत आहेच त्याचबरोबर राज्यातील सर्वच पत्रकारांनी त्याचा निषेध केला पाहिजे… असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी केले आहे.


मो. 94227 95910

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *