दुर्गाडी किल्ल्यावर सम्राट अशोक विद्यालयाने साजरा केला शिवजन्मोत्सव.
![]()


दुर्गाडी किल्ल्यावर सम्राट अशोक विद्यालयाने साजरा केला शिवजन्मोत्सव.
ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) – दुर्गाडी किल्ल्याच्या ऐतिहासिक आठवणी विद्यार्थ्यांना करून देत सम्राट अशोक विद्यालयाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे औचित्य साधत दुर्गाडी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव साजरा केला. पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य मोरे, वाहतूक शाखेचे
पोलीस उपनिरीक्षक गोरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली. इयत्ता तिसरी ते नववीच्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले. माध्य. विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील प्राथ. विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता नलावडे शाळेचे शिक्षक गणेश पाटील, माधुरी काळे, संगीता महाजन, उर्मिला साबळे, शोभा देशमुख, संतोष कदम, रामदास बोराडे, किरण राणे ,विजया वामन, वैशाली शेगोकार,मनाली साबळे, चतुरा मडके ,विद्या कांबळे व मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. शिवाजी महाराज ,अफजल खान व इतर वेशभूषेतील विद्यार्थी नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.एकूण 140 विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

