1 min read

शारदा माध्यमिक विद्यालय व एन.एम
कोठारी कनिष्ठ महाविद्यालय आणि स्काऊट विभागाने शिवजयंती उत्साहात साजरी

Loading

आज दिनांक १९ फेब्रुवारी 2023 रोजी शारदा माध्यमिक विद्यालय व एन.एम
कोठारी कनिष्ठ महाविद्यालय आणि स्काऊट विभागाने शिवजयंती उत्साहात साजरी केली.

प्रथम सर्व विद्यार्थी व सर्व स्काऊट विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसराची साफ सफाई केली. सकाळी ठीक ०८:३० वाजेला शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.के.जे.सिसोदिया होत्या.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून गर्जा महाराष्ट्र माझा या राज्य गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.महाराजांच्या कार्यावर आधारित पोवाडे व सुंदर चालीवरती शिवबांची गीते सादर करण्यात आले. निवडक विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भाषणे केली. श्री एस एस भवरे सर यांनी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला.सर्व कार्यक्रमाची तयारी आणि नियोजन स्काऊट प्रमुख एस.व्ही. गर्जे ,आर आय सुर्यवंशी , व्ही एच चौधरी श्री के जे सोनवणे एम आर तडवी , श्री .डी जी टाक यांनी केली .श्री आर जी राठोड यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर श्री व्ही पी महाजन यांनी आभार मानले.

कॉफी मुक्त परीक्षा प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *