विजय नाना पाटील आर्मी स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे उपक्रमशील शिक्षक अनिल पाटील गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित..
![]()

राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्यातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2022 23 हा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजय नाना पाटील आर्मी स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे उपक्रमशील शिक्षक श्री अनिल नथू पाटील यांना जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण काल दिनांक 18 फेब्रुवारी रोजी अल्पबचत भवन जळगाव येथे मान्यवर व सुरेश पाटील मेडिकल कोर यांच्या शुभहस्ते व डॉक्टर केतकी पाटील संचालक गोदावरी फाउंडेशन, डॉक्टर महेंद्र काबरा, संदीप वाघ ,ज्ञानेश्वर वाघ ,त्यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला त्यावेळी बहुसंख्येने पुरस्कार स्वीकारणारे नातेवाईक उपस्थित होते

