1 min read

आगरी कोळी अंबरनाथ शिव-महोत्सव मध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते केला गेला सन्मान वर्दीचा!
आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक…

Loading

आगरी कोळी अंबरनाथ शिव-महोत्सव मध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते केला गेला सन्मान वर्दीचा!
आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक…

ठाणे: ( प्रतिनिधी)
महाशिवरात्री निमित्त अंबरनाथ येथील प्राचीन काळी शिव मंदिर येथे भव्य आगरी कोळी अंबरनाथ शिव-महोत्सव, यात्रा महोत्सव सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन आयोजित केला आहे, त्यानिमित्त अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार.डॉ.बालाजी किणीकर यांनी आर एस पी अधिकारी शिक्षक युनिटचे कार्य पाहून कौतुक व अभिनंदन करत पुष्गुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले.यावेळी या यात्रा महोत्सवाच्या मुख्य आयोजक नगरसेविका सौ. सुजाता दिलीप भोईर व समाजसेवक दिलीप भोईर, अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कापरे , वाहतूक पोलीस उपनिरीक्षक पाटोळे , तसेच अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम मधील सर्व पोलीस अधिकारी यांनी संपूर्ण आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे नेतृत्व ,कर्तव्य,व शिस्त, पाहून कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांच्या कार्याचा परिचय देत संपूर्ण आर एस पी युनिट चे अभिनंदन केले.यावेळी आर एस पी अधिकारी दत्तात्रय पाटील, योगेश अहिरे, संतोष गोरडे, रविंद्र जाधव यांचेही पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आगरी कोळी अंबरनाथ शिव-महोत्सव २०२३ हा प्रथमच अंबरनाथ जनविकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. दिलीप भोईर व नगरसेविका तथा महिला आघाडी अध्यक्षा सौ. सुजाता दिलीप भोईर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकारी सदस्य यांच्यातर्फे दिनांक १० फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आयोजित केलेला आहे, या अंबरनाथ महोत्सवाला ठाणे जिल्ह्यातील सर्व धर्मीय नागरिक, सर्वपक्षीय नेते मंडळी, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वारकरी सांप्रदायिक मंडळी, सिने अभिनेते, अभिनेत्या, महाराष्ट्राचे लाडके आगरी कोळी बांधवांचे सर्व गायक व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहून सतत नऊ दिवस हा महोत्सव साजरा करण्यासाठी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य केल्याबद्दल या सर्व मंडळींचे आभार आयोजक सौ सुजाता दिलीप भोईर व श्री दिलीप भोईर यांनी मानले…
महाशिवरात्र व शिवजयंती हे दोन्ही उत्सव एकत्र साजरा करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले त्यामुळे आम्ही आमच्या परिसरातील सर्व शिवप्रेमी, शिवभक्त यांचे मनापासून आभार मानतो असे नगरसेविका सुजाता दिलीप भोईर यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना सांगितले. तसेच गेल्या नऊ दिवस आमच्या परिसरातील सर्व नागरिकांनी आम्हाला हा महोत्सव साजरा करण्याची संधी दिली व कोणत्याही प्रकारचे गालबोट या महोत्सवाला लागू दिले नाही म्हणून माझ्या सर्व महिला वर्गाचे व नागरिकांचे मी मनापासून आभार मानते, जरी या महोत्सवाचा पहिला वर्ष असला तरी आम्ही आमच्या पद्धतीने हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले फक्त दहा दिवसात या महोत्सवाचे आयोजन आमच्या संपूर्ण टीमने केले त्यामुळे आमच्या संपूर्ण टीमचे देखील मी आभार मानते यावर्षी काही त्रुटी असतील त्या त्रुटी पुढील वर्षी सुधारण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू असेही त्यांनी शेवटी सांगितले, या आगरी कोळी महोत्सवा मुळे आमच्याशी इतरही समाज जोडले गेले याचा आनंद ही आम्हाला झाला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *