1 min read

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

Loading

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

अमळनेर प्रतिनिधी
देवगांव देवळी ता.अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथे 19 फेब्रुवारी शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्काऊट शिक्षक एस के महाजन होते.
व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन ,क्रीडा शिक्षक अरविंद सोनटक्के, स्काऊट शिक्षक एच.ओ माळी होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. इयत्ता आठवीतील रागिनी पाटील, व नववीतील भाग्यश्री पाटील भावेश माळी हिमांशू पाटील आकांक्षा जाधव गायत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. दहावीतील हर्षला पाटील व स्नेहल पाटील यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे गाणे सादर केले.
अध्यक्ष भाषणातून स्काऊट शिक्षक एस के महाजन म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे सुराज्यात निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचे पूजन झाले पाहिजे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख आय. आर महाजन यांनी केले. आभार प्रदर्शन एच.ओ माळी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *