1 min read

राहुल कोळी यांना राज्यस्तरिय गुणवंत पुरस्कार प्रदान

Loading

राहुल कोळी यांना राज्यस्तरिय गुणवंत पुरस्कार प्रदान

जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत भवन सभा गृहात सन 22 23 या वर्षाचे राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव चे पुरस्कार वाटप समारंभ थाटात संपन्न झाला श्री राहुल अरुण कोळी मनपा शाळा क्रमांक 51 सिन्नर फाटा नाशिक यांना यावर्षीचा राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव चा मानाचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2022-23 हा गोदावरी फाउंडेशनच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते संचालिका माननीय डॉक्टर केतकी उल्हास पाटील यांच्या शुभहस्ते अध्यक्ष संदिपा वाघ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात गुलाब पुष्प पुस्तक व सन्मानचिन्ह देऊन श्री राहुल अरुण कोळी यांना गौरवण्यात आले सदर पुरस्कार श्री राहुल अरुण कोळी यांनी आपले आई-वडील व गुरुजन श्री आर एस पाटील यांना अर्पण केला आहे सदर प्रसंगी कोळी सरांचे वडील बंधू सुधीर कोळी श्री किशोर पाटील श्री पद्माकर चौधरी श्री अजय पाटील श्री सोमनाथ पाटील मित्रपरिवार उपस्थित होते श्री राहुल कोळी सरांचे सर्व मित्र परिवार व सर्व स्नेहींकडून अभिनंदन व कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *