शैक्षणिक गुणवत्तेबरोबर आवडती कला जोपासा.
![]()
शैक्षणिक गुणवत्तेबरोबर आवडती कला जोपासा.
मुलांनो बोर्ड परीक्षेचे टेन्शन घेऊ नका.
गुलाबराव पाटील

ठाणे ( मनिलाल शिंपी)* – बारावीच्या परीक्षा बावीस फेब्रुवारी पासून सुरू होत असून दोन मार्च पासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. वर्षभर आपण अभ्यास केला पास होणारच बोर्ड परीक्षेचे अजिबात टेन्शन घेऊ नका.
राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. डोंबिवली येथील रेल चाइल्ड संस्था संचलित महात्मा गांधी शाळेच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गुलाबराव पाटील ,संस्थेचे अध्यक्ष नितीन दिघे, कोषाध्यक्ष उल्हास झोपे, कार्यवाह भगवान सुरवाडे तर सहकार्यवाह दिलीप झरकर, मुख्याध्यापक सुरेश बोरसे उपस्थित होते. नितीन दिघे म्हणाले.उर्वरित दिवसाचे महत्त्व लक्षात घेता वेळेचे नियोजन व नियोजनानुसार अभ्यास करा .गुलाबराव पाटील म्हणाले कृतीपत्रिका व्यवस्थित अभ्यासली तर त्याच्यातच उत्तरे असतात आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा. एकाग्रतेने पेपर सोडवा .शाळेकडे तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण असल्याने पास होणे आता सोपे झाले आहे. दहावी नंतर आपली आवडती कला जोपासा .अभ्यासा बरोबर कलेची साथ असू द्या .स्पर्धेच्या युगातअष्टपैलू व्यक्तिमत्व तयार करा असेही म्हणाले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश बोरसे यांनी केले तर सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी सलोनी मोहिते व सलोनी बाणे यांनी केले. शाळेच्या सहशिक्षका प्रिया जोशी यांनी आभार मानले.

