शिवजयंती च्या पूर्वसंध्येला मंजुश्री वानखेडे ह्या विद्यार्थिनीने रेखाटले शिवरायांचे आकर्षक स्केच
![]()

शिवजयंती च्या पूर्वसंध्येला मंजुश्री वानखेडे ह्या विद्यार्थिनीने रेखाटले शिवरायांचे आकर्षक स्केच
अमळनेर(वार्ताहर):-दि.19 फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती.आणि ह्या महासोहळ्याचे निमित्त साधत अनेक चित्रकार, शिक्षक, विद्यार्थी, कलाकार शिवाजी महाराजांचे स्केच रेखाटण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळेल.असाच एक प्रयत्न सेंट मेरी इंग्लिश स्कूल मधील इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनी कु. मंजुश्री निरंक वानखेडे हिने केला आहे. अतिशय कमी वेळेत तिने हे स्केच काढून पूर्ण केले. तिला तिचा लहान भाऊ देवेश याने प्रेरणा दिली .देवेश हा गेल्या आठवड्यापासून शिवरायांचे चित्र काढण्याचा प्रयत्न करत होता. परंतु त्याला समाधानकारक चित्र काढता येत नव्हते तेव्हा त्याची मोठी बहीण मंजुश्री ने हे उत्कृष्ट चित्र काढून भावाला पण प्रशिक्षण दिले आणि त्याच्या कडूनही काढून घेतले.देवेश हासुद्धा सेंट मेरी स्कूल चा इ दुसऱ्या इयत्तेत शिकणारा विद्यार्थी आहे. मंजुश्री ही लोण बु. येथील माऊली कृषी सेवा केंद्राचे संचालक निरंक बाबुराव पाटील यांची कन्या असून तिचे इ 6 वी पर्यंतचे शिक्षण हे गुजरात मध्ये झाले असल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी होते याचे कुतूहल वाटत असे. परंतु आता मात्र स्वतः आपण सुद्धा ह्या महासोहळ्याचे साक्षिदार असल्यामुळं त्यांना विशेष आनंद झाला आहे. दोन्ही भावंडांचे सेंट मेरी च्या प्राचार्य सिस्टर जॉइस, कलाशिक्षक दिलीप पाटील, एलआयसी कॉलनी परिसरातील नागरिक, लोण गावातील नागरिक ,यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

