1 min read

पिंगळवाडे येथे बाला उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय प्रेरणा सभा उत्साहात संपन्न…

Loading

पिंगळवाडे येथे बाला उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय प्रेरणा सभा उत्साहात संपन्न…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)

“डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट लवकर शिकता येते, त्यामुळे बाला उपक्रम जि.प.शाळांना नवसंजीवन ठरेल.” – आमदार अनिल पाटील जिल्हा परिषद जळगाव चा अभिनव उपक्रम Building As Learning Aid (BALA) - इमारत एक शैक्षणिक साधन. "बाला" या उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी अमळनेर तालुक्यातील समावेश असलेल्या 19 जि.प.शाळांना जिल्हा नियोजन समितीतून 70% अनुदान प्राप्त होणार असून उर्वरित 30% अनुदान लोकसहभाग अथवा ग्रामपंचायत निधीतून "बाला" या उपक्रमातील 43 निकष पुर्ण करणेबाबत मार्गदर्शन कार्यशाळा अर्थात तालुकास्तरीय प्रेरणा सभा अमळनेर तालुक्याचे आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांचे अध्यक्षतेखाली जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे येथे आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमास गटविकास अधिकारी विशाल शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुधीर पाटील, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, शापोआ अधिक्षक भुपेंद्र पाटील, सशिअ अभियंता वसंत मोरे, केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंके, अशोक सोनवणे, रविंद्र पाटील, भगवान पाटील, प्रविण वाडीले, गजानन पाटील, विश्वास पाटील, छगन पाटील, ज्ञानेश्वर पाटील तसेच तालुक्यातील ज्येष्ठ पदाधिकारी अनिल शिसोदे, मिलिंद पाटील, सुभाष पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांनी मांडले व गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी ग्रामपंचायत व शाळा यांच्या समन्वयातून बाला उपक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या. पिंगळवाडे शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक दत्तात्रय सोनवणे यांनी पीपीटीच्या माध्यमातून बाला उपक्रमातील 43 निकषा बाबत सखोल माहिती देत पिंगळवाडे जि.प.शाळेत लोकसहभागातून पुर्ण केलेल्या कामाबाबतचे आपले अनुभव मांडले. तसेच जवखेडा शाळेचे मुख्याध्यापक छगन पाटील यांनीही त्यांचे अनुभव कथन केले. 2021-22 या शैक्षणिक वर्षात अमळनेर तालुक्यातून बाला उपक्रमांतर्गत निवड करण्यात आलेल्या पिंगळवाडे व जवखेडे येथील जि.प.शाळांनी 100% लोकसहभागातून काम पुर्णत्वासाठी प्रयत्न केल्याबद्दल दोन्ही गावचे सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक व ग्रामसेवक यांचा आमदार अनिल पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पिंगळवाडे ग्रामपंचायत तर्फे पंधरावा वित्त आयोगातून शाळेसाठी घेतलेल्या 3 एलईडी टीव्ही संचांचे सरपंच मंगला देशमुख, उपसरपंच अतुल पाटील, ज्येष्ठ सदस्य देविदास देशमुख, समाधान पारधी, ग्रामसेवक विलास पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत आमदार अनिल पाटील यांचे शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले. सदर प्रेरणा सभा शै.वर्ष 2022-23 मध्ये समावेश असलेल्या तालुक्यातील जळोद, दोधवद, अमळगाव, चोपडाई-कोंढावळ, रढावण, सारबेटे उर्दू, दहिवद बु., देवगाव देवळी, नगाव बु., गडखांब, शिरुड, जैतपिर, गलवाडे, फाफोरे बु., सावखेडा, कळमसरे बॉ., निंब, मांडळ बॉ., मारवड बॉ. या 19 जि.प.शाळांसाठी आयोजित करण्यात आलेली असल्याने तेथील सरपंच, ग्रामसेवक, मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंगळवाडे शाळेच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थीनी श्रुती पाटील व मयुरी पाटील यांनी केले. आभार पिंगळवाडे शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना ठेंग यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेतील उपशिक्षक दत्तात्रय सोनवणे, पदवीधर शिक्षक प्रविण पाटील, उपशिक्षक रविंद्र पाटील व वंदना सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *