1 min read

गुड शेपर्ड स्कुलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न…

Loading

गुड शेपर्ड स्कुलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न…

पाल्याला मिळालेलं पारितोषिक पालकांसाठी मोलाचं — नितीनकुमार देवरे

धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील सर

धरणगाव — येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज गुड शेपर्ड स्कुलचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम आलेल्या अतिथी मान्यवरांच्या आगमन प्रसंगी इ.८ वी च्या विद्यार्थ्यांनी लेझीम सादर केली. इ.६, ७ आणि ९ वीच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर करत मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आलेल्या अतिथींचा परिचय शिक्षिका सपना पाटील यांनी करून दिला. सर्व अतिथी मान्यवरांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्या चैताली रावतोळे यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर करून विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तद्नंतर इ.नर्सरी ते १० वी पर्यंत सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. शाळेतील विविध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, कला आणि कार्यानुभव, गुणवंत विद्यार्थी, तालुकास्तरावर झालेल्या स्पर्धा, शैक्षणिक स्पर्धा, विविध स्पर्धात्मक परीक्षा या सर्व स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थांना मेडल, सन्मानपत्र आणि शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. ज्या विद्यार्थांना कोणतेही बक्षीस मिळालेलं नाही त्यांना देखील प्रेरणा मिळावी म्हणून मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धरणगाव चे प्राचार्य प्रा.डॉ.के.एम.पाटील सरांनी सर्व स्टाफ चे तोंडभरून कौतुक केले. शाळेच्या चिमुकल्यांना उत्तुंग भरारी घेण्यासाठी यशाचा मूलमंत्र दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष धरणगाव तहसिलचे तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी सांगितले की, पाल्याला मिळालेलं पारितोषिक पालकांसाठी अत्यंत मोलाचं असतं. मोबाईल चा अतिरिक्त वापर टाळून विद्यार्थ्यांनी वाचन केलं पाहिजे जेणेकरून तुम्हांला उद्याच्या यशाची चव चाखता येईल असा मौलिक सल्ला देवरे साहेबांनी दिला.
कार्यक्रमाच्या अतिथी म्हणून प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमिला गावित, हर्षाली पुरभे, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, लक्ष्मण पाटील, सागर गायकवाड हे सर्व शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी – विद्यार्थीनी, पालक बहुसंख्येने उपस्थित होते. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना पाटील (रँकर्स सेक्शन), स्वाती भावे (केजी सेक्शन), पूनम कासार (1st to 5th सेक्शन), पुष्पलता भदाणे (6th to 10th la सेक्शन) यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे अतिशय रंगतदार पध्दतीने सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सपना पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *