कळमसरे येथील माळी समाजाचे मितभाषी व्यक्तिमत्व लोटन बळीराम चौधरी(माळी) यांचे वृद्धपकाळाने निधन..
उद्या सकाळी अकरा वाजता राहत्या घरून निघणार अंतयात्रा..।
![]()

कळमसरे येथील माळी समाजाचे मितभाषी व्यक्तिमत्व लोटन बळीराम चौधरी(माळी) यांचे वृद्धपकाळाने निधन..
उद्या राहत्या घरून सकाळी अकरा वाजता निघणार अंतयात्रा..।
अमळनेर प्रतिनिधी- कळमसरे तालुका अमळनेर येथील माळी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते, माजी ग्रामपंचायत सदस्य मितभाषी व्यक्तिमत्व लोटन बळीराम चौधरी यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना गावात नांजी म्हणून ते प्रसिद्ध होते अत्यंत साधे व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणाचे बाळकडू देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले होते.
कळमसरे ता अमळनेर येथील लोटन बळीराम चौधरी(वय- 82)
यांचे आज दि.14 फेब्रुवारी सायंकाळी ,8:30 ला वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. ते येथील रघुनाथ चौधरी , साकळी तालुका यावल येथील माध्यमिक शिक्षक गोपाल चौधरी यांचे वडील तर प्रशांत चौधरी साहेबराव चौधरी यांचे आजोबा होते.
कै लोटन नांजी चौधरी यांना महात्मा फुले हायस्कूल देवगाव देवळी ता.अमळनेर संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी यांच्या तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

