राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल विजयी खेळाडूंचे जामनेर शहरात जल्लोषात स्वागत.
![]()
🏆 राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल विजयी खेळाडूंचे जामनेर शहरात जल्लोषात स्वागत.
🟣 विविध शैक्षणिक सामाजिक, राजकीय, क्रीडा, बँक, संस्थेकडून करण्यात आला जाहीर सत्कार..!
दि.१४/०२/२०२३
जामनेर:- जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा १९ वर्षे आतील गट मुले यांनी नुकत्याच सातारा येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करून ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल तसेच १७ वर्ष आतील गट मुले यांनी मुख्यमंत्री चषक शालेय जिल्हास्तरीय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल दोन्ही विजयी संघाचे आज सकाळी ९:३० वा. जामनेर शहरात विविध राजकीय शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, संस्थेकडून भव्य मिरवणूक व जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
गुलाबफूले व झेंडूच्या माळांनी जीपगाडीची सजावट करण्यात आली होती त्यावर सर्व विजयी खेळाडू गुलाबी फेटाबांधून राज्यस्तरीय व मुख्यमंत्री चषक घेऊन विराजमान झाले होते.
मिरवणुकीची सुरुवात सुपारीबाग या परिसरातून ढोल ताशाच्या गजरात झाली. पारंपारिक वेशभूषेत मुलीचे लेझीम पथक, शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने सहभागी होऊन रॅलीची सुरुवात करण्यात आली,
त्यानंतर पंचायत समिती या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा नरवाडे, व्ही डी पाटील, एम पी सावखेडकर, पी एल महाजन, यांच्या तर्फे खेळाडूंचे औक्षण करून व बुके देऊन खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
पुढे रॅलीचे मार्गक्रमण करत नगरपरिषद चौक या ठिकाणी जाहीर सत्कार जामनेर नगरपरिषद नगराध्यक्षा सौ.साधनाताई महाजन, लॉर्ड गणेशा स्कूलचे प्रशासकीय अधिकारी सतीश मोरे, समन्वयक विजय मोरे, क्रीडा शिक्षक आनंद मोरे, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आतिष झाल्टे, मयूर पाटील, जालनसिंग राजपूत, शेतकी संघ उपसभापती बाबुराव गवळी, संचालक रमेश नाईक, पंडित दिनदयाल उपाध्याय शैक्षणिक संस्थेचे एकलव्य शाळा ॲड. शिवाजी नाना सोनार, जळगाव जनता सहकारी बँक शाखाचे जेष्ठ संचालक महाले, विविध दैनिक वृत्तपत्राचे पत्रकार बांधव,पालक वर्ग आदी. विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुढे रॅलीचा समारोप इंदिराबाई ललवाणी विद्यालयात जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित,जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे, इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र महाजन सचिव किशोर महाजन, संचालक फकीरा काका धनगर , संचालक श्रीराम नाना महाजन, संचालक के.व्ही.महाजन, उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे, पर्यवेक्षक प्रा.के.डी.निमगडे, पर्यवेक्षक प्रा.जी.जी.अत्तरदे, बी पी बेनाडे आदी.च्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते प्रशासकीय प्रमाणपत्र, ट्रॉफी व शाल देऊन गौरविण्यात आले.
तसेच क्रीडा विभाग प्रमुख गिरीश पाटील, डॉजबॉल राष्ट्रीय खेळाडू सुष्मित पाटील यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उच्च माध्यमिक विभागाचे क्रीडाशिक्षक प्रा.समीर घोडेस्वार यांनी केले.
तर संपूर्ण मिरवणूक यशस्वीरित्या संपन्न झाल्याबद्दल जाहीर आभार मुख्याध्यापक जे.पी.पाटील यांनी मानले.
राज्यस्तरावर सुवर्णपदक प्राप्त करून जामनेर शहराचे नाव लौकिक केल्याबद्दल इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे आधारस्तंभ श्रद्धेय बाबूजी ईश्वरलालजी जैन यांनीही कौतुक केले.
मिरवणूक यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.




