कळमसरे येथील कलारत्न यशवंत महाजन राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित…
![]()
राज्य दैनिक जीवनदीप वार्ता आयोजित राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार २० २३ चा बहुमान मिळाला पण तो पुरस्कार घेण्यासाठी मी उपलब्ध नव्हतो कारण मी बाहेरगावी होतो परंतु माझे आदरणीय काका श्री. सुधाकर महाजन सर यांनी नवनिर्वाचित शिक्षक पदवीधर आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांच्या हस्ते सन्मानपत्र,स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या अगोदरही कला रत्न व कलाभूषण कळमसरे येथील रहिवासी कलाशिक्षक यशवंत महाजन अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यांचे मित्रपरिवार व कळमसरे परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.



