1 min read

राज्य शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन करा-

Loading

राज्य शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन करा-

अनिल बोरनारे यांची शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी

मुंबई (प्रतिनिधी) राज्य शासनाने घोषित केलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार तातडीने प्रदान करण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.
याबाबत अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे
समाजाची नि:स्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. वर्ष २०२१-२२ चे पुरस्कार दि २९ डिसेंबर रोजी शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाद्वारे घोषित करण्यात आले यामध्ये प्राथमिक माध्यमिक, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणारे शिक्षक, विशेष कला-क्रीडा शिक्षक, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक अशा एकूण १०८ शिक्षकांना राज्य पुरस्कार घोषित करण्यात आले दि ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते परंतु राज्यात शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली तथापि आता निवडणुका झाल्या असल्याने तातडीने मुंबई राज्य पुरस्काराचे आयोजन करून शिक्षकांना सन्मानित करण्याची मागणी अनिल बोरनारे यांनी केली आहे.

चौकटीत
राज्य शिक्षक पुरस्कार योजना १९६२-६३ पासून महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित असून, ती शालेय शिक्षण विभागांमार्फत राबविली जाते. सन २०२१-२२ पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून सदर पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यात येणार आहे. या पुरस्काराची रक्कम रु.१०,०००/- (रुपये दहा हजार फक्त) आहे.तसेच राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दिनांक ४ सप्टेंबर, २०१४ च्या शासन निर्णयान्वये ठोक रक्कम रुपये १,००,०००/- (रुपये एक लाख फक्त) अदा करण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *