जितका तुमचा संघर्ष मोठा, तेवढेच तुमचं यश मोठं,भद्रा प्रतिक मॉलचे मालक प्रताप आबा साळी यांनी विद्यार्थ्यांनीं दिला मौलिक संदेश….
![]()


अमळनेर प्रतिनिधी- इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ निमित्ताने देवळी हायस्कूल मधील विद्यार्थिनी काही गिफ्ट घेण्यासाठी भद्रा प्रतीक मॉलमध्ये गेल्या व विद्यार्थिनींचा भद्रा प्रतीक मॉलचे मालक आबासाहेब प्रताप साळी यांनी स्वागत केले व त्यांना मॉलमधील अनेक वस्तूविषयी माहिती देऊन त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली.
ते म्हणाले की देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मधील दहावीच्या विद्यार्थ्यांची संवाद साधतांना मला मनापासून आनंद होतोय कारण आपण सर्वजण उद्याचा नवा भारत घडविणारे विद्यार्थी आहात मित्रांनो मी आपल्याला मनापासून सांगू इच्छितो की देशाचा इतिहास ज्यांनी ज्यांनी घडवला त्यांनी प्रत्येकांनीच आपल्या आयुष्याच्या कमी वयामध्ये इतिहास घडवला आहे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर ,राजश्री शाहू महाराज
यांचे कार्य आपणास प्रेरणादायी आहे.
इयत्ता दहावीच्या वर्गामध्ये शिकत आहात आपलं वय सुद्धा आता ह्याच वयामध्ये आहे जीवनाची सुरुवात आपणास करावी लागेल. त्यासाठी आपण आता वेळ अजिबात वाया घालू नका, कारण आपली पहिली पायरी आहे, दहावीची परिक्षेत चांगल्या मार्कांनी गुणसंपादन करणे हे तुमचे ध्येय असावे. भविष्यात एक मोठे अधिकारी व्हा, नोकरीला लागा, चांगल्या व्यवसायात उतरा ,निश्चितच तुम्ही माझ्या माझ्या मॉलला भेट दिली, तुम्हाला मी वाशिंग मशीन बक्षीस दिल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे ..तुम्हाला ज्या ज्या गुरुजनांनी घडवला आहे याचं मला सार्थ अभिमान आहे, तुमच्या मधील गुणवत्तेची चुणूक मला दिसत आहे व आपण भविष्यात एक चांगले आदर्श नागरिक बनाल हे तेवढेच सत्य.. तुमचे शिक्षक ईश्वर महाजन सर हे माझे चांगलेच मित्र आहेत, त्यांच्यापासून मला काही बरच काही शिकायला मिळालं, ते माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत पण त्यांच्याकडून मला बरचं काही शिकायला मिळतं, व्यक्ती लहान असो का मोठा असो प्रत्येकाकडून आपल्याला शिकायला मिळत असतं पण ते घेण्याची आपली इच्छा असली पाहिजे. आपणासही ते चांगल्या प्रकारे ज्ञानदान करतायेत याचा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही ग्रामीण भागातील असल्याने मला अजून अत्यानंद झाला, पाडळसरित धरणासाठी निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांना आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्ड लिहिली खूप आनंद झाला व तुमचे आई-वडील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून जीवन जगून तुम्हाला शिकवत आहेत तेही महत्त्वाचे आहे.
तुम्हाला जीवनात सहजासहजी कोणतीच गोष्ट मिळणार नाही, त्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागेल जितका तुमचा संघर्ष मोठा असेल तेवढं तुमचं यश मोठं असतं त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने जीवनात संघर्ष करा, नक्कीच तुमचं यश सर्वात जास्त मोठे असेल मी पुन्हा एकदा आपण सर्वांना दहावीच्या परीक्षेच्या मनापासून शुभेच्छा देतो असे भद्रा प्रतीक मॉलचे मालक व मा. नगरसेवक आबासाहेब प्रताप साळी यांनी विद्यार्थ्यांना मौलिक संदेश दिला.
दहावीतील विद्यार्थिनींना प्रेमाने त्यांच्याशी हितगुज करून त्यांना थंड पेय दिले, देवगांव देवळी हायस्कूलचे शिक्षक, सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा पत्रकार ईश्वर महाजन यांनी आभार मानले.
जितका तुमचा संघर्ष मोठा, तेवढेच तुमचं यश मोठं
भद्रा प्रतिक मॉलचे मालक प्रताप आबा साळी यांनी विद्यार्थ्यांनीं दिला संदेश….

