संतश्रेष्ठ नरहरी महाराज पुण्यतिथी दिनानिमित्त मुक्ताईनगरीत समस्त सोनार समाजाच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात शस्त्रक्रिया शिबिर संपन्न
![]()





संतश्रेष्ठ नरहरी महाराज पुण्यतिथी दिनानिमित्त मुक्ताईनगरीत समस्त सोनार समाजाच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात शस्त्रक्रिया शिबिर संपन्न
संतश्रेष्ठ नरहरी महाराज पुण्यतिथी दिनानिमित्त समस्त सोनार समाज मुक्ताईनगर तर्फे नुकतेच मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन प्रवर्तन चौक मुक्ताईनगर या ठिकाणी भव्य स्वरूपात संपन्न झाले याप्रसंगी समाजातील जेष्ठ नागरिक श्री भास्करसेठ शुरपाठणे श्री राजधर सेठ बुडूखले यांच्या हस्ते संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी कार्याध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी या शिबिराचे महत्त्व समाज बंधु, भगिनींना विशद केले प्रसंगी सोनार समाजाचे अध्यक्ष श्री प्रवीणभाऊ शुरपाठणे सल्लागार श्री विजय शुरपाटणे यांनी डॉ. सुनील मेश्राम यांचा गुलाब बुके देऊन सत्कार केला याप्रसंगी 140 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येऊन 24 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी निवडण्यात आले. प्रसंगी समाजबांधवांनी डॉ शिवचरण उज्जैनकर यांचा गुलाब बुके देऊन सत्कार केला याप्रसंगी उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर ठोसर श्री गणेश मुंधोकार सचिव श्री मनोज सोनार सहसचिव श्री सुरेश शुरपाटणे , ओमप्रकाश अनासुने, खजिनदार श्री योगेश बुडूखले प्रसिद्धीप्रमुख श्री विजय उंबरकर, श्री सुरज तळेकार ,श्री गोविंद सोनार , श्री संजय ठोसर,श्री संजय मांडवेकर , चि. सचिन उज्जैनकर चि. अरविंद उज्जैन कर या सह सोनार समाज बांधव व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

