संगीत आणि कल्पकता याचा सुरेख मिलाप..!
![]()
संगीत आणि कल्पकता याचा सुरेख मिलाप..!
टाकाऊ वस्तूंपासून स्वरांजली संगीत ग्रुपचे संचालक श्री.किशोर देशपांडे यांनी बनवले संगीतमय रुखवत.


अमळनेरच्या किशोर देशपांडे हे संगीत साधनेत आपले आयुष्य घालवत आहेत.त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये संगीताचा लवलेश आढळतो. त्यांच्या घरी गेल्यावर लता मंगेशकर ,मोहम्मद रफी, यांच्या सह विविध सिने कलाकारांचे छायाचित्र दिसतात.त्यांनी स्वतः हातांनी चित्रित केले आहेत.
गेल्या आठवड्यात जळगांव येथे एक लग्न होते .आता लग्न म्हटले म्हणजे नवरी सोबत रुखवत दिले जाते. श्री किशोर देशपांडे यांनी रद्दीतील पुठ्ठे, काड्या, टोकरच्या कांबळ्या वजा चूहीठ्या इत्यादी टाकाऊ वस्तूंपासून रुखवत साठी तबला, हार्मोनियम, गिटार , पियानो, तसेच स्वर्गीय लता मंगेशकर यांचे स्वतःच्या हातांनी काढलेले छायाचित्र,कॅलेंडर, बैलगाडी ,श्री विठ्ठलाच्या भक्तांची उभेऊब वाटणारी मिरवणूक , सुंदर बंगला अश्या विविध वस्तू भेट म्हणून दिल्या .
त्यांच्या या विशेष कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे …!!!

