1 min read

शीर्षक – आभाळ फाटलं…!कथा:

Loading

कथा:

शीर्षक – आभाळ फाटलं…!

त्या भर ऊन्हात…
दगडाला घाम फुटला होता.
लाही-लाही तापले होते दगड….! ‘ तो’ फोड आल्या हाताने , दगड उचलून धुऱ्यावर टाकता-टाकता , डोळ्या समोर काळा अंधार झाला..! पोटात, दोन-चार दिस झाले अन्नाचा ‘कण ‘नव्हथा…!

तिन मुल़…आणि आतापर्यत
त्याच्या साउली होउन माघ धावणारी ‘ती’..! तिनं कधीच अथरुंन धरलं होत.

जीव तळमळ करत होता, त्याच्या डोसक्यात नुसता
विचाराचा डोंगर फुटत होता
क्षणभर त्याला वाटले …
डोसक्याच्या चिंधाड्या झाल्या…

चक्र आल्यागत जमीनिवर कोसळत डोसक्याल हात लावून बस्ता झाला…
तेवढ्यात, त्याच्या कानात आरोळी गुंजली…
‘हाक’ काळजातली होती,तसा तो तडकण उठला…
धोतर खोचत , उभा राहतो तोच-काळाजा गोळा ‘हंबरडा’
फोडत त्याला बिलगत….
“भाकर-भाकर , नाना भाकर.. ! असे म्हणत तो ही
डोळे लावतो, ते कायमचे….!

याला ,धरती कमी पडली
मोठ्यानं ओरडू,लागला..
जोरजोरानं…डोस्कं आपटू
लागला….

एवढयात, चार -दोन जंण आणि तरणी पोराचा गोळका त्याच्या भउती गोळा झाला.

काशा, त्याचा जीवा भावा मैतर, थर-थर आवाज …कंठाच्या भाहीर निघत नव्हथा .
त्याचा खांद्याचा रुमाल बाळाच्या अंगावर झाकु लागला… “बाप ओरडला…
आसमान फाटला.”….
धरती हादरली..केवढा तांडव झाला… जेव्हा, अंथुरणातील ‘माय’
हे ऐकताच , इथे “प्राण”
सोडला…!

आखरी,
चित्ता जळाली…
“मलाही जाळा म्हटला”…

अशी दुर्दयी वेळ,काळ ठरला….!
“आभाळ- फाटले, आभाळ फाटले” … तो ही देवाकडे
मरण माघत होता…!
(बोध- विकट,असाह्य ,हतबल परिस्तिथी, दैनंदिन जीवनातील संंगर्ष,अनेक…इ.
ज्याकडे, सधंन वर्गाचे गेल्या कित्येक पिढयानं पासून, जाणून-बुजून जळ-जळीत
दुर्लक्ष…..! )
………………………………
बबनराव वि.आराख
गांगलगाव
जि.बुलडाणा
७८७५७०१८०६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *