1 min read

“संकल्प निरोगी महाराष्ट्राचा” माध्यमातून अडावद आरोग्य केंद्रात महाआरोग्य शिबिराचे आयोजन.

Loading

“संकल्प निरोगी महाराष्ट्राचा” माध्यमातून अडावद आरोग्य केंद्रात महाआरोग्य शिबिराचे आयोजन.

राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून..
महाराष्ट्र शासनामार्फत “संकल्प निरोगी महाराष्ट्राचा” या उपक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र-अडावद येथे,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. तुषार देशमुख,सिव्हिल सर्जन डॉ.किरण पाटील यांचे आदेशाने,
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर यांच्या नेतृत्वाखाली व वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना पाटील तथा डॉ.अक्षय पाटील यांच्या नियोजनाखाली आज दिनांक-९ फेब्रुवारी २०२३ गुरूवार रोजी सकाळी मोफत भव्य “महाआरोग्य” शिबिराचे आयोजन करण्यात आले,
शिबिराचे अध्यक्ष म्हणुन RKS व अडावद ग्रामपंचायतच्या सदस्या- भारती महाजन,
तर शिबिराचे उदघाटन ग्रामपंचायत सदस्य- हनुमंत महाजन यांच्या हस्ते आरोग्याची दैवत श्रीधन्वंतरीच्या मूर्तीचे पुष्पहार अर्पण व पुजन करुन तर…

अडावद पोलीस चौकीचे API- गणेश बुवा,
PSI-चंद्रकांत पाटील,
तथा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य-शकील भाई, भैय्याभाऊ साळुंखे, पी आर माळी सर, रियाजअली- कालुमेंबर,
ग्रामपंचायत सदस्य-कृष्णा महाजन, सामाजिक कार्यकर्ते-अमोल कासार, प्रकाश महाजन, पांडुरंग महाजन, तसेच
वृत्तपत्र दिव्यमराठीचे वार्ताहर-मनोहर देशमुख, पुण्यनगरीचे वार्ताहर-जितेंद्र शिंपी, लोकमतचे वार्ताहर-नरेंद्र खबायत, देशदूत चे वार्ताहर-गणेश परदेशी, साप्ताहिक महेश न्यूजचे वार्ताहर-महेश गायकवाड, व
वैद्यकीय अधिकारी- डॉ.अर्चना पाटील, डॉ.अक्षय पाटील आदी..

वरीलप्रमाणे सर्वच उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

या शिबिरात रोग निदान व उपचारासाठी 377 रुग्णांनी.. पूर्णतः मोफत लाभ घेतला.

1) उच्च रक्तदाबाची तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण,
2) डोळे तपासणीसाठी 43 रुग्णापैकी,
मोतीबिंदू आजरासाठी 16 रुग्ण बाधीत आढळून आले,
3) एकूण गरोदर मातांची तपासणी केली रक्तातील साखरेचे प्रमाण,
हिमोग्लोबिन चे प्रमाण, Cbc, थायरॉईड तपासणी,HBSAG तपासणी, एकूण 40 गरोदर माता व इतर 6 रुग्णाची HIV साठी तपासणी केली,
4) एकूण 0 ते 6 वयातील 20 लहान बालकांची तपासणी झाली,
5)उच्च रक्तदाब व शुगर साठी 21 स्तनदा माताची तपासणी केली,
6) नेत्रतपासणी साठी 26 रुग्णांची तपासणी करून त्यात 16 रुग्ण मोतीबिंदू साठी निघाले.
7)जनरल NCD तपासणीत 172 रुग्णांच्यामधुन..
पैकी 8 रुग्ण उच्च रक्तदाब,
02 रुग्ण जास्त प्रमाणात शुगर असलेले तर,
दृष्टी दोष असलेला 1 रुग्ण तपासणीतून आढळून आले आहेत,

वरील असे एकूण 11 बाधीत रुग्णांना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी संदर्भ सेवेसाठी पाठविण्यात आले.

शिबिरातील रुग्णांची तपासणी चोपडा येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ-डॉ.चंद्रहांस पाटील, अडावद येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ-डॉ. प्रफुल्ल पाटील, नेत्ररोग तपासणी-डॉ.गौरव चौधरी, जनरल NCD रुग्णाची तपासणी ही वैद्यकीय अधिकारी तथा समुदाय आरोग्य अधिकारी यांनी केली.

हे महा आरोग्य शिबिर यशस्वीते करिता….
वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना पाटील, डॉ.अक्षय पाटील,
आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.राहुल पाटील, डॉ. दिनेश चौधरी, डॉ.माधुरी महाजन, डॉ.भूषण देशमुख,
आरोग्य सहाय्यीका-शोभा चौधरी, गट प्रवर्तक-शालूबाई सोनवणे, संध्या बोरसे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ-गणेश महाजन, महालॅब-सचिन माळी,
आरोग्य सेवक-विजेन्द्र पवार, संतोष भांडवलकर,
आरोग्य सेविका-उज्वला परदेशी, निवेदिता शुक्ल, सुनीता दुधे, आशा धनगर, प्रियंका महाजन, अल्काबाई गवळी,
परिचर-धुडकु वारडे, बापु कोळी, मनोज चावरे, दिलीप पाटील…
तसेच ग्रामीण भागातील सर्व आशा सेविका आदिंनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सुरुवातीला सूत्रसंचालन व शेवटी मान्यवरांचे आभार.. आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *