1 min read

सर्वसामान्यांच्या मनामनात घर करणाऱ्या सोन्या पाटील यांची साथ म्हणजेच खरा मदतीचा हात – डॉ. किशोर पाटील
ज्ञानेश्वर पवार यांनी मानव सेवेतून साकार केले गुरुकुल- डॉ. मनीलाल शिंपी

Loading

सर्वसामान्यांच्या मनामनात घर करणाऱ्या सोन्या पाटील यांची साथ म्हणजेच खरा मदतीचा हात – डॉ. किशोर पाटील
ज्ञानेश्वर पवार यांनी मानव सेवेतून साकार केले गुरुकुल- डॉ. मनीलाल शिंपी
समाज कल्याण न्यासच्या वतीने वणी गाव येथे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप!
ठाणे :(मनिलाल शिंपी) समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष
डॉ.श्री. सोन्या काशिनाथ पाटील यांच्या संकल्पनेतून समाज कल्याण न्यासची अनोखी मानवसेवा करण्याची संधी नाशिक जिल्ह्यातील
वणी दिंडोरी परिसरातील ज्ञान कौशल्य बहुउद्देशीय संस्था क. वणी, वास्तल्य ग्रह अनाथ आश्रम क.वणी, जगदंबा नगर तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील निराधार शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप महाराष्ट्र राज्य समाज कल्याण न्यास चे संस्थापक अध्यक्ष, धर्मसेवक डॉ. सोन्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करून मनाला आनंद वाटले, मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपचे प्रमुख, आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी, व दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.किशोर बळीराम पाटील,यांच्या प्रमुख उपस्थितीत सप्तशृंगी गडावर असलेल्या आश्रम शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करून,आई जगदंबेच्या दर्शनाचा लाभ घेण्याची संधी आम्हा सर्वांना मिळाली.तसेच सप्तशृंगी देवीचे मुळरुप,असलेल्या वणी गावात देवीचे मूळ स्थान जगदंबा देवीचे दर्शन घेण्याचा योग देखील मिळाला.आणि वात्सल्य अनाथ आधार आश्रम येथील अनाथ मुलांना दप्तर वाटप करून समाज कल्याण न्यास या संस्थेचे प्रत्यक्ष कार्य पाहून खूप आनंद आणि उत्साह वाढला.
गेल्या अनेक वर्षापासून समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य ही संस्था अनेक सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, भिवंडी मॅरेथॉन स्पर्धा घेत आहेत, त्याचप्रमाणे जीवा महालाच्या १६ व्या वंशज्यांना
स्व.खर्चाने घर बांधून दिले, आदिवासी, कातकरी ,गोरगरीब महिलांना भावबीज म्हणून दरवर्षी दहा हजार साड्यांचे वाटप करत असतात, म्हणूनच
सर्वसामान्यांच्या मनामनात घर करणाऱ्या धर्म सेवक डॉ.सोन्या पाटील यांची साथ म्हणजेच खरा मदतीचा हात असे यावेळी दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले,
या संस्थेने वात्सल्य आधार आश्रमातील एका सामान्य महिलेने घरात सुरुवात केलेले हे आधार आश्रम म्हणजे गुरुकुल आहे, व ज्ञानेश्वर पवार यांच्या सहकार्याने हे गुरुकुल सुरू आहे याची जाणीव आम्हाला सर्वांना झाली म्हणून उपस्थित मान्यवरांनी आर्थिक मदतीचा हात देखील यावेळी पुढे केला, सध्या या ठिकाणी २५/३० निरागस अजाण बालकांना भेटून खूप समाधान वाटले. व एक सहलीचे समूह गीत सामूहिक नृत्य सादर करून संपूर्ण विद्यार्थ्यांच्या मनात प्रसन्न वातावरण निर्माण करून दिले. मानव सेवेतून साकार केलेले हे गुरुकुल भविष्यात सर्वगुणसंपन्न होओ या सदिच्छा व्यक्त करतो असे यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर मणिलाल शिंपी यांनी सांगितले, पहिलीपासून ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या या चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. ते पाहून मुलांना खूप आनंद झाला.या कार्यक्रमाला रायगड जिल्हा संपर्कप्रमुख श्री संतोष वालीवकर, नाशिक जिल्हा समाज कल्याण न्यास चे अध्यक्ष श्री.राजेश खर्डीकर,नाशिक येथील मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रूपच्या भगिनी सौ. मायाताई चव्हाण, व सौ. अनिताताई बाविस्कर, वणी तालुका समाज कल्याण न्यास चे अध्यक्ष मयूर बेनके, वणी शहर भारतीय जनता पक्षाचे प्रमुख श्री.मयूर जैन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दर्शन दायमा, यांनी विशेष मेहनत घेतली. त्यानंतर परतीचा प्रवास करताना दिंडोरी येथील समाजसेवक श्री.प्रवीण जाधव यांनी समाज कल्याण न्यास चे संस्थापक अध्यक्ष डॉ सोन्या पाटील यांच्यासह डॉ. मनिलाल शिंपी , व दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर पाटील ,रायगड जिल्हा संपर्कप्रमुख श्री संतोष वालीवकर, नाशिक जिल्हा समाज कल्याण न्यास चे अध्यक्ष श्री.राजेश खर्डीकर,नाशिक यांचा सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *