1 min read

अमळनेरला 13 फेब्रुवारी ला संत गजानन महाराजांचा प्रकट दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन..

Loading

अमळनेरला संत गजानन महाराजांचा प्रकट दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेरला संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व गजानन परिवारांना भाविक भक्तांना विनंती की 13 फेब्रुवारी 2023 सोमवार रोजी संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 6 ते 7 माऊलींचा अभिषेक व आरती, सकाळी 8 ते 10 लघु रुद्र विशेष पादुकापूजन नितीन भावे महाराज शुभ हस्ते
होणार आहे.
सकाळी 10 ते 11 चक्रीय पारायण (सामूहिक) ,सकाळी 11 ते 12 माऊलींचा सत्संग तरी सर्व बंधू-भगिनींनी माऊलीचा दर्शनाचा वरील कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे आवाहन गजानन महाराज सेवा संस्था अध्यक्ष प्रा.आर.बी.पवार व विश्वस्त मंडळ व गजानन परीवार यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण-
श्री संत गजानन महाराज मंदिर दादासो जी.एम सोनारनगर मुंदडा नगर 1 जवळ
अमळनेर
महाप्रसाद वेळ
दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत आहे तरी याची नोंद घ्यावी.