राष्ट्रीय शिक्षण संस्था आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव व कौतुक समारंभ संपन्न.
![]()

राष्ट्रीय शिक्षण संस्था आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव व कौतुक समारंभ संपन्न.
मुंबई ठाणे( मनिलाल शिंपी):शनिवार दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी संस्थेच्या हेडगेवार सभागृहामध्ये पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी)शिष्यवृत्ती प्राप्त व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) प्राप्त विद्यार्थ्यांचा त्याचप्रमाणे डॉ. रघुनाथ माशेलकर पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव व कौतुक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सन 2021-22 मधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती प्राप्त 13 विद्यार्थ्यांचा , माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त 7 विद्यार्थ्यांचा तसेच डॉ. रघुनाथ माशेलकर पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन संस्था अध्यक्ष डॉ.सुभाष वाघमारे , सहकार्यवाह श्री. प्रमोद उंटवाले , कोषाध्यक्ष श्री.शिरीष फडके व बाल वैज्ञानिक स्पर्धा प्रमुख डॉ. सरोज कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान व गौरव करण्यात आला. प्राथमिक विभागातून कु. गजेंद्र संजय साठे व माध्यमिक विभागातून कु.अथर्व राम पाटील हे विद्यार्थी 2022-23 च्या डॉ. रघुनाथ माशेलकर पुरस्काराचे मानकरी ठरले.
सदर कौतुक समारंभ प्रसंगी प्रास्ताविक श्री.प्रमोद उंटवाले यांनी केले. प्रास्ताविक करीत असताना,विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व शिक्षकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या परीक्षांकडे वळवावे असे त्यांनी सांगितले. आजचे प्रमुख पाहुणे संस्था अध्यक्ष डॉ. श्री.सुभाष वाघमारे यांनी आपल्या मनोगतातून मुख्याध्यापक,शिक्षक, पालक व यशवंत विद्यार्थी या सर्वांना मध्यवर्ती ठेवून, नको हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाकावा. व सातत्याने आपण कार्यतत्पर राहावे. व स्वतःला नेहमी उत्तम रित्या घडवीत राहावे. त्यातून यश आपल्या पाठीमागे येत असते. सर्वोच्च पदव्या व पदे आपल्याला मिळत राहतात.एक सामान्य शिक्षक एस.एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई येथे कुलसचिव पदापर्यंत पोहोचू शकतो हे त्यांनी आपले स्वतःचे अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले. व सर्वांना प्रेरित केले .सातत्यपूर्ण अभ्यास असेल तर कोणत्याही परीक्षेची आपल्याला भीती नसते. त्याचप्रमाणे आपली संस्था खूप मोठी आहे ,संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासाठी आपण सर्वांनी झपाटून काम केले पाहिजे असे आपल्या मनोगतातून नमूद केले. सदर प्रसंगी संस्था पदाधिकारी डॉ. शरद धर्माधिकारी, श्री. करमरकर, श्री. दांडेकर ,श्री. रानडे, श्री.आहेर व श्री.देवकर उपस्थित होते.
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून ओवी मोंडे, ऊर्वी गोडबोले, अथर्व पाटील यांनी आपल्या
मनोगतनातून अभ्यासात सातत्य असल्या कारणानेच आम्ही या यशाची मानकरी ठरलो असे स्पष्ट केले . शिक्षक प्रतिनिधी म्हणून सौ.रेखा महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी श्रीमती सुनंदा बेडसे यांनी प्रमुख पाहुण्यांचे तुळशीचे रोप व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्याचप्रमाणे विष्णूनगर प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले.सौ.मेघा कांबळी यांनी निवेदन केले. गुणवंत विद्यार्थ्यांची यादी वाचन सौ. गौरंगी जोशी यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. रेश्मा गणवीर यांनी केले. सौ.नयना पाटील यांच्या सुमधुर आवाजातील पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

