1 min read

ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी दीपक जाधव राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित..

Loading

ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी दीपक जाधव राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित..

मुंबई ठाणे( मनिलाल शिंपी ): पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर यांचे वाचक (रीडर) ऑंटी ला फोन लाव पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव (मानपाडा पोलीस ठाणे) यांनी केलेल्या उत्कृष्ट/उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त 26 जानेवारी 2023 रोजी, देशाचे आदरणीय राष्ट्रपती भारत सरकार यांनी” राष्ट्रपती पोलीस पदक”सर्वोच्च सन्मानाने गौरवले आहे. मा. पोलीस आयुक्त ठाणे, सह पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्यासह संपूर्ण पोलीस वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन आणिकरण्यात कौतुक करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण देशातून एकूण 54 व महाराष्ट्रातून ४ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये कर्तव्यनिष्ठ, व मनमिळाऊ असे पोलीस अधिकारी दीपक जाधव यांना सन्मानित करण्यात आले आहे. दीपक जाधव यांचे मूळ गाव प्रसिद्ध कवी बा. सी. मर्ढेकर, यांचे जन्मगाव आहे. 1985 मध्ये अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन पोलीस दलात हजर झाले. सेवेत असताना देखील कॉमर्स शाखेतील बीकॉम व एलएलबी चे मुंबई विद्यापीठात शिक्षण पूर्ण केले.सेवा कालावधीत दीपक जाधव यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून 550 पेक्षा अधिक उत्कृष्ट सेवा पत्र प्रशस्तीपत्र, रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे, त्यांच्या सेवा अभिलेख निरंतर अति उत्कृष्ट (outstanding A+) असा आहे. यापूर्वी दीपक जाधव यांना 15 ऑगस्ट 2006 रोजी पोलीस दलातील ” गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल तत्कालीन राष्ट्रपती भारत सरकार यांनी पोलीस पदक देऊन गौरवले आहे. याशिवाय पोलीस महासंचालक, राज्य, यांच्याकडून प्रशांत सेवेबद्दल सन 2000 मध्ये सन्मान चिन्ह, देऊन गौरवण्यात आले होते. तसेच 2007 मध्ये देश प्रेमी मित्र पुरस्कार, व कर्मवीर पुरस्कार 2007 असे आगाव वेतन वाढी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.दीपक जाधव यांनी अवैध अमली पदार्थ,(ड्रग),अवैध हत्यारे,/ दारूगोळा हस्तगत करणे, कोरोना महामारी, एम पी डी ए, हद्दपारीची कारवाई,तासेश समाजातील दुर्बल घटकांना, पीडित महिला,अपंग व्यक्ती,ज्येष्ठ नागरिक,यांच्याबद्दल अत्यंत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विशेष कामगिरी बजावली आहे.त्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांना दुसऱ्यांदा भारताचे माननीय राष्ट्रपती,भारत सरकार यांनी,पोलीस पदक देऊन सन्मानित केले आहे.त्याबद्दल मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपचे प्रमुख आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी,दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील, स्वामीनारायण ट्रस्टचे अध्यक्ष डॉ दिनेश भाई ठक्कर यांच्यासह समाजातील प्रत्येक स्तरातून दिपक जाधव साहेब यांचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *