1 min read

श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन…

Loading

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिवस म्हणून साजरी ———–! !
अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज 30 जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी हुतात्मा दिवसाचे स्मरण करून इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले सदरप्रसंगी उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जीवन कार्याचा तसेच चले जाव चळवळ अर्थात भारत छोडो आंदोलन याविषयी माहिती दिली तसेच आपल्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले ,योगदान दिले प्रसंगी ‘ वंदे मातरम ‘ ! ‘भारत माता की ,जय ‘ ! असा जयघोष करून आपल्या प्राणाची भारत मातेला जणू काही आहुतीच दिली. स्वातंत्र्य सैनिकांची प्रेरणा घेऊन आपल्या शैक्षणिक प्रेमींनी एकत्र येऊन महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळ अशा शैक्षणिक संस्थेची स्थापनाbजून 1987 मध्ये करून त्या अंतर्गत श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर अमळनेर या नावाने शाळा सुरू केली. त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले आपण प्रत्यक्ष अनुभवात आहोत. सदर प्रसंगी मुख्याध्यापक संदीप पवार, व्हि. डी. पाटील, ए. पी. जाधव, पी. एम . ठाकरे, डी. एस. माळी, वाय. जे .पाटील तसेच शिक्षिका बी. एस. चव्हाण, एस .एस. तेले ,ए.यू .महाजन, आर.एम. ताडे , सी.डी.निकम, पी. पी. पाटील आदी सर्व उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चतुर्थ कर्मचारी अशोक सैदाने यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *