राष्ट्रीय कराटे स्पर्धेत मोहोने संघ अव्वल स्थानी
![]()

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत मोहोने संघ अव्वल स्थानी
मुंबई ,ठाणे( मनिलाल शिंपी ):जापनिस शोतोकान फेडरेशन ; डोंबिवली शाखेच्या शिहान जितेंद्र कोरी यांच्या अध्यक्षतेखालि सहाव्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन शुक्ला हॉल कोळसेवाडी कल्याण येथे 29 जानेवारी रोजी करण्यात आले होते
या स्पर्धेत सातशे खेळाडूंनी कांता व कुमिते या कराटे प्रकारांत वेगवेगळ्या गटातून सहभाग घेतला होतां
यात मोहोने सारख्या ग्रामीण भागातून शिहान संतोष निरभवने सिक्स्त डिग्री ब्लेक बेल्ट असलेल्या प्रदीर्घ अनुभवी प्रशिक्षक यांच्या एन आर सी येथील शाखेतून 28 स्पर्धक ( मुले व मुली )सहभागी होऊन एकूण 56
मेडल साठी खेळत तब्बल
गोल्ड -25 सिल्वर -12 ब्रॉन्ज़ -18
असे 56 पैकी 55 मेडल व ट्रॉफी जिंकून पुनः एकदा संस्थेचे व मोहोन्याचे नाव गाजवलेल्या संघाचे सर्व स्थरातुन कौतुक होत आहे

