डॉ.पाकीजा पटेल यांना राज्यस्तरीय रणरागिनी पुरस्कार.
![]()

डॉ.पाकीजा पटेल यांना राज्यस्तरीय रणरागिनी पुरस्कार.
जिल्हा परिषद शाळा राजवड तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथील आदर्श शिक्षिका महिला शिक्षक संघटना राज्य कार्याध्यक्ष ,जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय व राज्य पुरस्कार संघटना राज्य कोषाध्यक्ष, निसर्ग व पर्यावरण प्रदूषण मंडळ राज्य जेष्ठ सल्लागार, अल्पसंख्यांक अधिकारी ,कर्मचारी संघटना राज्य उपसचिव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. पाकीजा उस्मान पटेल यांना वसुनंदिनी फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय रणरागिनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ.सुनिता मोडक, सिने अभिनेत्री वर्षा देशमुख, फाउंडेशनचे अध्यक्ष. विद्याधर सोनवणे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पाकीजा पटेल यांच्या शैक्षणिक सामाजिक व नुकताच लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांना मोफत स्पोर्ट्स ड्रेस दिल्याने व विविध उपक्रम राबविल्याने त्यांना पुरस्कार देण्यात आला. या यशाबद्दल पारोळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय संजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी कविता सुर्वे, विश्वास पाटील, शालेय पोषण आहार अधीक्षक सी .एम .चौधरी, केंद्रप्रमुख गोविंद मिस्तरी यांनी अभिनंदन केले आहे.

