1 min read

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची रंगभरण स्पर्धा- पं. ने. ने. समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा नाविन्यपूर्ण उपक्रम…

Loading

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची रंगभरण स्पर्धा- पं. ने. ने. समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा नाविन्यपूर्ण उपक्रम…

अमळनेर – पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा स्वयंसेवकांचे निवासी शिबिर एकरखी, तालुका अमळनेर या दत्तक गावी दिनांक 24 जानेवारी ते 30 जानेवारी 2023 दरम्यान आयोजित केले आहे. शिबीर कालावधीमध्ये अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रोटरी क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 28/01/2023 रोजी एकरुखी येथील जिल्हा परिषद शाळा व स्थानिक अंगणवाडी च्या माध्यमातुन शालेय विद्यार्थ्यांची रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना रंगांची पारख व्हावी आणि त्यांची कलात्मक दृष्टी चालना मिळावी. तसेच त्यांनी काढलेल्या पोस्टर वरील घोषवाक्यांचे गावात भिंती पत्रके म्हणून उपयोग करण्याच्या या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील उपसरपंच तात्यासाहेब सुरेश जी पाटील अंगणवाडीच्या मुख्याध्यापिका मॅडम जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राष्ट्रीय स्वयंसेवक विभागाचे स्वयंसेवक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा विजयकुमार वाघमारे प्राध्यापक डॉक्टर श्वेता वैद्य प्राध्यापक डी आर ढगे, सेवक सरदार यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन शिबिर समन्वयक कार्यक्रम अधिकारी डॉ. अस्मिता सरवैया यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संचालक श्री अभिजीत भाऊ भांडारकर, संचालक डॉक्टर नांद्रे सर जिल्हा समन्वयक डॉक्टर मनीष करंजे,चोपडा विभाग समन्वयक संजय शिंगाने, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *