महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंचाद्वारे निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिर येथे हळदीकुंकू..
![]()
जळगाव -महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंचाद्वारे निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिर येथे शनिवार दि.28 जानेवारी २०२३ रोजी चिंतन परिषद आयोजित करण्यात आली होती.परिषदेत धनगर आरक्षणा संदर्भातील अंतिम सुनावणी बाबत न्यायालयात सुरु असलेल्या लढया संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष श्याम वर्डीकर यांनी केले. धनगर आरक्षणा बाबत न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याची सद्यस्थिती बाबत संपूर्ण सखोल मार्गदर्शन राज्य संघटक चंद्रशेखर सोनवणे यांनी केले.सूत्रसंचालन अविनाश सावळे व आभार प्रदर्शन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अमृता सावळे यांनी केले. औचित्यपूर्वक महिला समाज भगिनींना हळदी कुंकू देखील देण्यात आले. कार्यक्रमास बहुसंख्येने समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.


