विद्यार्थ्यांनी वाचनकलेतून भारताचा सुजाण नागरिक व्हावे- गोकुळ बागुल
-जळोद जि.प.शाळेत बालवाचनालयाचे उदघाटन
![]()


विद्यार्थ्यांनी वाचनकलेतून भारताचा सुजाण नागरिक व्हावे- गोकुळ बागुल
-जळोद जि.प.शाळेत बालवाचनालयाचे उदघाटन-
- विद्यार्थ्यांनी वाचनाची गोडी निर्माण करून जास्तीत जास्त पुस्तकाचे ज्ञान मिळवावे व वाचनकलेतून भावी भारताचा सुजाण नागरिक बनावे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक गोकुळ बागुल यांनी जि.प.उच्च प्राथमिक शाळा जळोद ता.अमळनेर येथे बालवाचनालय उदघाटन प्रसंगी केले.पुणे येथील सद्गुरू सेवा प्रतिष्ठान संस्थेतर्फ जळोद शाळेत बालवाचनालय स्थापन करण्यात आले.प्रसंगी उडघाटक म्हणून साहित्यिक गोकुळ बागुल बोलत होते.यावेळी वाचन चळवळीचे कार्यकर्त प्रवीण महाजन, शालेय व्याविस्थापन समितीचे अध्यक्ष सतीलाल भोई यांच्यासह विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.
यावेळी पुणे येथील वाचन चळवळीचे कार्यकर्ते प्रवीण महाजन यांनी विद्यार्थ्यांना वाचनकलेचे महत्व पटवून दिले व संपूर्ण राज्यात तब्बल चारशेपेक्षा अधिक वाचनालय स्थापन केल्याचे सांगितले.सद्गुरू सेवा प्रतिष्ठान मार्फत यावेळी दोनशे पुस्तकाचे भेट देण्यात आली. याकामी पुणे येथील अभियंता सचिन म्हसे यांचे सहकार्य लाभले.प्रास्ताविक मुख्यध्यापिका सुरेखा देसले यांनी केले तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कुवर यांनी पार पाडले. आभार जयश्री पवार यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक शैलेश शिंदे, एस एम शिरसाठ व गावातील युवक आकाश भोई यांचे सहकार्य लाभले.

