1 min read

अभिनव विद्यामंदिरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, मानवी मनोरे देशभक्तीपर गीतांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध

Loading

अभिनव विद्यामंदिरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा मानवी मनोरे देशभक्तीपर गीतांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले

ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी) ::छत्रपती शिक्षण मंडळाच्या कल्याणमधील पारनाका येथील अभिनव विद्यामंदिराच्या प्रांगणात देशाचा ७४ वा भारतीय प्रजासत्ताक अतिशय उत्साहात व आनंदात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी यावेळी मानवी मनोरे कवायत लेझीम ची प्रात्यक्षिके व देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले शाळेचे मुख्याध्यापक संपत गिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी सैनिक दिगंबर फडणीस सूर्यकांत गठडी मनोहर शिर्के आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते त्यात, नरेंद्र पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) सुनिल पवार (पोलीस निरीक्षक), विजय अहिरे(सहा.पोलीस निरीक्षक), अंजिक्य मोरे(पोलीस उपनिरीक्षक) शेख साहेब(पोलीस उपनिरीक्षक) संतोष भुंडेरे साहेब (पोलीस उपनिरीक्षक ) बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.संस्थेचे उपाध्यक्ष श्रीनिवास दातार, संस्थेचे सरचिटणीस व शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. निलेश रेवगडे उपस्थित होते. तसेच शाळेचे माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सर्व माजी सैनिक व आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी डंबेल्स कवायत , रिंग कवायत , मानवी मनोरे व लेझीम प्रात्यक्षिके ,देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. तद्नंतर आनंदीबाई सभागृहात संस्थेचे सरचिटणीस आणि शालेय समितीचे अध्यक्ष मा. डॉ. निलेशजी रेवगडे अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात माजी सैनिक दिगंबर फडणीस यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शालेयस्तरावरील विविध स्पर्धा व उपक्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व्हावे याकरिता बक्षीस समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला अभिनव विद्यामंदिर शाळेचे पालकप्रतिनिधी आणि पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणचे सरचिटणीस डॉ निलेश रेवगडे तसेच मुख्याध्यापक संपत गिते आणि पर्यवेक्षक अरुण आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक समिती व शिक्षकवृंद यांच्या सहकार्याने संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *