1 min read

सम्राट अशोक विद्यालयात प्रजास्ताक दिन उत्साहात साजरा::

Loading

सम्राट अशोक विद्यालयात प्रजास्ताक दिन उत्साहात साजरा::

आपला भारत देश सर्वधर्म समभाव विविधतेने नटलेला देश आहे.

  • गुलाबराव पाटील

ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी – पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक हायस्कूल, सेंट वाय सी इंग्लिश स्कूल, सम्राट अशोक इंग्लिश स्कूल सम्राट अशोक प्राथमिक विद्यालय, विपश्यना बालविहार यांच्या संयुक्त विद्यमाने ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला .कोकण विभाग शिक्षक आमदार निवडणुकीमुळे आचारसहिता असल्याने सम्राट अशोक हायस्कूलचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. इतर देशांच्या तुलनेत भारत देश सुजलाम सुफलाम आहे. विविध जाती धर्म, साधु संत वेगवेगळ्या रूढी परंपराने नटलेला व संस्कृती जपणारा आपला देश आहे.भारत देशात जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे .पालकांनी आपल्या मुलांना जपायला हवं मुले हीच आपल्या देशाची संपत्ती आहे. त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या.विद्यार्थ्यांबरोबर उपस्थित पालकांना गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन केले .इयत्ता नववी एम सी सी/आर एस पी च्या विद्यार्थ्यांबरोबर इतर विद्यार्थ्यांनी कवायत संचलनातून तिरंगी झेंड्याला सलामी दिली.सामुदायिक संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले .क्रांतिकारक महापुरुषांच्या वेशभूषेतील लहान विद्यार्थी कार्यक्रमाचे आकर्षण होते.कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष पी.टी. धनविजय पालक प्रतिनिधी, इतर विभागाचे मुख्याध्यापक सुजाता नलावडे, पंकज सर, संतोष जाधव सर व मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले परिसरात प्रभात फेरी काढून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *