प्रजासत्ताक दिनानिमित्त तीर्थक्षेत्र रामदरा येथे वृक्षारोपण
![]()


प्रजासत्ताक दिनानिमित्त तीर्थक्षेत्र रामदरा येथे वृक्षारोपण
लोणी काळभोर- ७४ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त तीर्थक्षेत्र रामदारा महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने ५०० झाडाचे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विश्वशांती गुरूकुल एम. आय. टी लोणी काळभोर येथील १ पहीली ते आठवी च्या १६० विद्यार्थी सहभागी झाले होते . या वेळी ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री.अमित जगताप, ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष श्री.दत्तात्रय शेंडगे, योगेश घुले, प्रविण जाधव. विश्वशांती गुरूकुल चे रोहीत सिंग सर,शिवमोहन सर,अजित सिंग सर,प्रशांत सुरवसे,गणेश आठवले,लखन कांबळे,मनोज लहारे उपस्थित होते.
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर, इ.स. १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते असे प्रतिपादन ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी केले. तसेच प्रविन जाधव यांनी सूत्रसंचालन व योगेश घुले यांनी आभार मानले

